संगमनेर प्रति: दि 12 सप्टेंबर २०२५ रोजी मिळालेल्या माहितीनुसार, ईद-ए-मिलादुन्नबी'च्या १५०० व्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून, संगमनेर शहरात 'सर्वधर्म समभाव' जपणाऱ्या संस्थांचा विशेष सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन, सर्वांसाठी मानवाधिकार आणि 'न्यूज एनएमपी मराठी' वृत्तवाहिनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सन्मानित संस्था आणि व्यक्ती
या सोहळ्यात पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीनुसार समाजात चांगल्या कार्याचा आदर्श घालून देणाऱ्या खालील संस्थांना त्यांच्या योगदानाबद्दल 'सन्मानचिन्ह' आणि 'कृतज्ञता सन्मानपत्र' देऊन गौरवण्यात आले:
एनआरसीसी ग्रुप मंत्री फाउंडेशन,एकता नगर सोशल फाउंडेशन, ह्युमन रिलिफ अल्पसंख्याक फाउंडेशन,मोगल पुरा मस्जिद ट्रस्ट
गवंडी पुरा मस्जिद ट्रस्ट, याचबरोबर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नारायणे (शिवकला पोहे सेंटर) आणि एस.डीपी.आय ग्रुप यांनाही विशेष सन्मानित करण्यात आले. या सर्व संस्था आणि व्यक्तींना मराठी भाषेत पवित्र कुराण, कुराण आणि विज्ञान, तसेच संत-महात्म्यांची पुस्तके भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला, जो धार्मिक एकतेचा संदेश देणारा क्षण ठरला.
मांदियाळी मान्यवरांची आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधींची
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अँग्लो उर्दू हायस्कूलचे चेअरमन श्री. गणी हाजी शेख यांनी भूषवले. तर, संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांमध्ये ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष गुड्डू भाई सैय्यद, रफिक भाई सैय्यद (उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष), मनीषा ताई पवार (उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा), सामाजिक कार्यकर्त्या तेजश्री बडगुजर आणि लोखंडे मॅडम, नाशिक पत्रकार संघटना जिल्हाध्यक्ष अकील पटेल, प्रा. शमशुद्दीन ईनामदार आणि माजी नगरसेवक नुरमहंमद यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार शौकत पठाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजीज भाई ओहरा यांनी केले. या सोहळ्याला संगमनेरसह अहमदनगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अस्लम बिनसाद, आरोग्य मित्र शाहनवाज शहा, ईनायमत सय्यद, अझहर भाई शेख (कोपरगाव), अफसर तांबोळी, मुजाहिद पठाण, काँग्रेस कमिटीचे संगमनेर शहर अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद शेख, जुबेर निसार खान, ठाकरे गटाचे शिवसेना कार्यकर्ते इम्तियाज शेख, फैसल सय्यद आणि सहसंपादक वसीम सय्यद (घारगाव), शिवसेना शिंदे गटाचे मजहर शेख,गुड्डू इंजिनियर, कुरेशी जमात अध्यक्ष नदिम कुरैशी आणि अफताब उर्फ पिंटू शेठ नाईकवाडी यांसह अनेक मांन्यवर मंडळीचा समावेश होता.
या सोहळ्यामुळे समाजात सकारात्मकता वाढीस लागून परस्पर सामंजस्य अधिक दृढ होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. हा सोहळा केवळ सन्मानापुरता मर्यादित नसून, तो धार्मिक सलोखा आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक बनला. सदर माहिती ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशनच्या महिला जिल्हाध्यक्षा बानोबी पठाण (शेख) आणि महासचिव तथा सहसंपादक जमीर शेख (बब्बू पाकीजा) यांनी दिली आहे.


Post a Comment