थोरात-विखे संघर्षात खताळ ठरले गेमचेंजर,संगमनेरचा यंग तुर्क थेट दिल्ली दरबारी
आ.खताळ यांचा अमित शाहांसमोर विकासाचा पंचनामा, अहिल्यानगरला देशातील पहिले सहकार विद्यापीठ मिळणार?
लोणी.अहिल्यानगर प्रति: दि. 5 ऑक्टोबर 2025 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, राज्यात राजकीय डबल इंजिन नाही, तर ट्रिपल इंजिन चे सरकार असताना मिळेल त्या संधीचं 'सोनं नाही, तर थेट कोहिनूर' करण्याची कडक खेळी संगमनेरचे जायंट किलर आमदार अमोल खताळ यांनी साधली आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री मा. श्री. अमितभाई शाह यांच्या लोणी येथील दौऱ्यात, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह संपूर्ण राजकीय वर्तुळ उपस्थित असताना, युवा आमदार खताळ यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या साथीने थेट दिल्लीचे दरवाजे ठोठावले आहेत. संगमनेर तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या भावी विकासाचा मास्टर प्लॅन असलेले निवेदन त्यांनी अमित शाह यांच्यासमोर सादर केले. या मागण्यांची व्याप्ती केवळ स्थानिक नाही, तर राज्याच्या नकाशावर जिल्ह्याला मोठे स्थान मिळवून देणारी असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
खताळ यांच्या 5 दमदार आणि टायमिंग'साधणाऱ्या मागण्या :
1) नाशिक-पुणे प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी संगमनेरचा समावेश तातडीने करा. 2) NH-60 (नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग) चे काम त्वरित हाती घेऊन तो सहा पदरी (Six-Lane) बनवा. 3) सहकार क्षेत्राचे केंद्र असलेल्या महाराष्ट्रात देशातील पहिले सहकारी तत्वावरील विद्यापीठ (Cooperative University) अहिल्यानगर जिल्ह्यात स्थापन करण्याची घोषणा करा. 4) संगमनेर तालुक्याला कृषी हब (Agriculture Hub) म्हणून विकसित करण्यासाठी विशेष केंद्रीय निधी आणि योजना द्या. 5) केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कामगार रुग्णालयाच्या स्थापनेला तत्काळ मंजुरी द्या.
या मागण्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पुढील स्तरावर योग्य ती कार्यवाही होईल असे स्पष्ट संकेत दिले असल्याची माहिती मिळून आली आहे.यामुळे एकूणच काय तर या गेमचेंजर भेटीमुळे आमदार अमोल खताळ यांचे वजन केवळ जिल्ह्यातच नाही, तर थेट केंद्राच्या राजकारणात वाढले आहे.एकाच व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित असताना, विकासाचा हा महत्त्वाचा विषय थेट दिल्लीच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे नेण्याची खताळ यांची राजकीय चतुराई चर्चेचा विषय ठरली आहे. संगमनेरकरांच्या विकासाच्या आशांना खऱ्या अर्थाने बुस्टर डोस मिळाला असून, येत्या काळात या मागण्यांवर केंद्राकडून काय निर्णय होतात, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.याप्रसंगी आमदार अमोल खताळ समवेत मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार, पालकमंत्री मा.श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा.श्री. जयकुमारजी गोरे, आ. शिवाजीराव कर्डिले साहेब, आ. काशिनाथ दाते सर, आ. विठ्ठलराव लंघे पाटील, आ.मोनिकाताई राजळे, आ. संग्रामभैय्या जगताप, आ. आशुतोष काळे, आ. विक्रम पाचपुते यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित होते, ज्यामुळे या मागण्यांना अधिक राजकीय बळ मिळाले आहे.
Post a Comment