
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या पुढाकाराने संगमनेर येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्रामस्थांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या. परिणामी आज या प्रकल्पाच्या कामाला देखील प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ अंतर्गत उभारला जाणारा हा प्रकल्प पारेगावसह परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
--------------------- चौकट --------------------
शहरात अनेक मोठ्या इमारतींना पार्किंगची सुविधा नाही. त्यांचे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात, ज्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. तरीही या बड्या मालकांवर नगरपालिका प्रशासन मेहेरबान का, असा प्रश्न विचारला जात आहे.या मोहिमेमुळे स्थानिक दुकानदार, अल्पभूधारक शेतकरी, भाजी विक्रेते आणि चहा टपरीधारक देशोधडीला लागले आहेत. अनेकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, स्थानिक व्यावसायिकांवर कारवाई होत असताना, दुपारी ४ नंतर रस्ते व्यापणाऱ्या बाहेरील राज्यातील फेरीवाल्यांवर (पाणीपुरी, मोमोज, चायनीज विक्रेते) प्रशासन मेहेरबान असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. तसेच काही ठिकाणी खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर मद्यप्राशनास मूकसंमती मिळत असल्याचेही निदर्शनास आणून दिले आहे.




पुढे बोलताना आमदार खताळ म्हणाले की, तालुक्यातील कऱ्हे, डोळासणे, चिकणी, अंभोरे, धांदरफळ खुर्द आणि निमज या गावांसह नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, शहापूर, घोटी बुद्रुक आणि घोटी खुर्द या भागांमध्ये वनविभागाच्या जमिनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. संगमनेर येथील उपविभागीय वनाधिकारी कार्यालय नगर येथे वर्ग केल्यामुळे संगमनेर व अकोले तालुक्यातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे कार्यालय पूर्ववत संगमनेर येथे सुरू करण्यात यावे.याचबरोबर संगमनेर येथे स्वतंत्र वनभवन उभारण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच वनहक्क कायद्यांतर्गत आदिवासी व वनपरिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर अर्ज प्रलंबित आहेत. संगमनेर मतदारसंघातील महसूल व वनविभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने विशेष मोहीम राबवावी, अशी विनंतीही आमदार अमोल खताळ यांनी सरकारकडे केली.
बाळासाहेब देशमाने हे नेहमीच ग्रामविकास आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावर्षी 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत अनेक उपक्रम राबवण्यात आले. 'असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी' या मोहिमेअंतर्गत रोटरी आय केअर ट्रस्टच्या सहकार्याने ७५ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रोटरी आय केअर हॉस्पिटलमध्ये मोफत उपचारांचे मार्गदर्शन व निवड करण्यात आली. देशातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता, अर्पण रक्तपेढीच्या माध्यमातून तरुण युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून श्री. देशमाने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. धांदरफळ आरोग्य उपकेंद्राच्या मदतीने जिल्हा परिषद शाळेतील १०४ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे व आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. संगमनेर येथील संग्राम निवास मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन व अन्नदान करून देशमाने यांनी आपली सामाजिक संवेदनशीलता जपली. ग्रामप्रशासनाला आधुनिकतेची जोड देत यावेळी 'ई-रेशन कार्ड' आणि ग्रामपंचायत मालमत्तेची माहिती देणाऱ्या 'क्यूआर कोड' (QR Code) उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे ग्रामस्थांना घरबसल्या पाणीपुरवठा कर पावती आणि शासकीय योजनांची माहिती मिळणे सोपे होणार आहे. तसेच, साई समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून ५५ ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमधील चुकांची दुरुस्ती करण्यात आली. 'हिंद दी चादर' उपक्रमांतर्गत श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान ते श्री क्षेत्र देहू येथे जाणाऱ्या बीज यात्रा पालखी सोहळ्यातील भाविकांनी सामाजिक एकता, बंधुता आणि सहिष्णुतेचा संदेश दिला.
त्याचबरोबर स्वदेश उद्योग समूहातील समीर परदेशी, योगेश देशमुख, सतीश दुर्गुडे, गोपीनाथ नाईकवाडी, अमोल डेरे, सागर घोलप, अक्षय पानसरे, गंगाराम सातपुते, महेश देशमुख, रघु दिघे, निखिल सानप, निरंजन सातपुते, भारत घुले, अशोक सातपुते, सचिन पोकळे, नितेश जोशी, संकेत करंजेकर यांच्या वतीने जीवदया गोशाळेसाठी चारा वाटप करण्यात आले. यावेळी गोशाळेचे व्यवस्थापक राजेश दोशी यांनी सांगितले की, उन्हाळ्यात चारा-पाण्याच्या टंचाईच्या काळात स्वदेश परिवार नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. तर स्वयंप्रेरित संस्थेचे अध्यक्ष संतोष पवार यांनी मूकबधिर विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, हा वाढदिवस म्हणजे माणुसकीचे दर्शन घडवणारा सोहळा असल्याचे म्हटले.
या कार्यक्रमाला स्वदेश युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनाथ देशमाने, नवनाथ नाईकवाडी, मोहन देशमाने, सचिन देशमाने, अविनाश देशमुख, राजेश शिंदे, किरण वाकचौरे, रोहन बनकर, दत्ता कासार, रामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुनील देशमुख, माजी सभापती अनिल देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी काळे, सरपंच सौ. उज्वला नवनाथ देशमाने, ग्रामविकास अधिकारी सुरेश मंडलिक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. सुप्रिया तोरकडी, डॉ. गौरव देवळे, संदीप घुले, नितीन कढणे, सुजाता वाकचौरे व त्यांच्या टीमने या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. वाढदिवसाच्या निमित्ताने राबवण्यात आलेल्या या 'लोकाभिमुख' उपक्रमांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
बसस्थानकासमोरील १५ बाय १५ मीटरची मोक्याची जागा स्मारकासाठी मिळावी, यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजीत तांबे यांनी १८ डिसेंबर २०२३ पासून राज्य शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेने ही जागा आता नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आली असून, यामुळे स्मारकाचा मार्ग प्रशस्त झाला आहे.स्मारकाच्या स्वरूपाबाबत शहरातील शिवप्रेमींमध्ये विविध मते आहेत. कोणाला 'अश्वारूढ' स्मारक हवे आहे, तर कोणाला 'सिंहासनाधीश्वर' किंवा 'उभे पूर्णाकृती' स्मारक हवे आहे. नागरिकांच्या या भावनांचा आदर करत नगरपरिषदेने लोकसहभागातून निर्णय घेण्याचे ठरवले आहे
मिरवणुकीत विविध पारंपरिक व ऐतिहासिक देखावे सादर केले जाणार असून त्यामध्ये सनई-चौघडे, शिवछत्रपती गौरव पालखी, अश्वदर्शन, हिंदू जनजागृती घोष पथक, मर्दानी खेळ, तसेच आदि योगी महादेव यांचा देखावा यांचा समावेश असणार आहे. याशिवाय अफजलखान वधाचा जिवंत देखावा विशेष आकर्षण ठरणार असून अघोरींचा देखावा, किंग स्टार ब्रास बँड पथक (मावळ) आणि एकलव्य ढोल-ताशा पथक यांच्या दमदार सादरीकरणामुळे वातावरण शिवमय होणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण संगमनेर दुमदुमून जाणार आहे.शिवसेना-भाजपा महायुतीच्या वतीने संगमनेरमधील सर्व शिवप्रेमी, युवक, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर करण्यासाठी तसेच नव्या पिढीपर्यंत स्वराज्याचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.