प्रभाग १० मध्ये नूरमोहम्मद शेख यांचा 'धोनी स्टाईल' विजय सर्वसामान्य महिलेला विजयी करून पुन्हा रचला इतिहास

नगराध्यक्षांनाही मिळवून दिले मोठे मताधिक्य; शेख गणी हाजी आणि इम्रान शेख यांची रणनीती ठरली यशस्वी.


संगमनेर प्रति : दि.25 डिसेंबर2025 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, संगमनेर नगरपालिकेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वात जास्त चुरशीच्या ठरलेल्या प्रभाग क्रमांक १० चा निकाल अखेर ऐतिहासिक लागला आहे. कोणत्याही राजकीय वारसा नसलेल्या एका सर्वसाधारण महिलेला नगरसेवक पदावर विराजमान करून, नगरसेवक नूरमोहम्मद पीरमोहम्मद शेख यांनी पुन्हा एकदा आपली 'टीम लीडर ' ही ओळख अधोरेखित केली आहे. भल्याभल्यांचे तर्क-वितर्क फोल ठरवत या प्रभागाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे.निवडणुकीच्या काळात प्रभाग १० मध्ये अनेक चर्चांना उधाण आले होते. विरोधक आणि काही राजकीय पंडित नूरमोहम्मद शेख यांच्यासोबत असलेल्या महिला उमेदवाराच्या पराभवाच्या शर्यती लावत होते. मात्र, मतदानाचा दिवस आणि त्यानंतर आलेल्या निकालाने सर्वांचे अंदाज धुळीस मिळवले. शकिला इलियास बेग यांच्या रूपाने एका सामान्य चेहऱ्याला सोबत घेऊन, कोणत्याही दगाफटक्याशिवाय नूरमोहम्मद शेख यांनी ही निवडणूक पूर्ण ताकतीने लढवली आणि जिंकूनही दाखवली.या निकालात नूरमोहम्मद शेख यांना २०१६ मते मिळाली, तर त्यांच्या सहकारी शकिला बेग यांनी १३३१ मते घेत अनपेक्षित विजय संपादन केला. विशेष म्हणजे, केवळ स्वतःचा विजय न पाहता, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. मैथिली तांबे यांना या प्रभागातून तब्बल २८७० मतांचे मोठे मताधिक्य मिळवून देण्यात शेख गणी हाजी, माजी उपनगराध्यक्ष इम्रान गणी शेख आणि नूरमोहम्मद शेख यांची टीम यशस्वी ठरली. या विजयामागे गेल्या ९ वर्षांपासून नगरसेवक म्हणून नूरमोहम्मद शेख यांनी केलेली जनसेवा आणि नेत्यांचे पाठबळ कारणीभूत ठरले असल्याचे दिसून आले आहे.त्यातच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे खंबीर नेतृत्व आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा दांडगा जनसंपर्क.आमदार सत्यजित तांबे यांचे '२.० व्हिजन' आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या मागील कामांची पावती.आणि किंग मेकरच्या भुमिकेत ​शेख गणी हाजी आणि इम्रान गणी शेख यांची सूक्ष्म नियोजनातील खंबीर साथी मुळेच.विशेष :  मागील पंचवार्षिक मध्ये एका सर्वसाधारण महिलेच्या नंतर पुन्हा शकिला बेग यांच्या वचनपूर्तीचा इतिहास रचला गेला मागील निवडणुकीत मतदारांनी मागिल काळातही एका सर्वसामान्य महिलेला नगरसेविका बनवून सर्वांना चकित केले होते. तोच इतिहास त्यांनी २०२५ मध्ये शकिला बेग यांच्या विजयाने पुन्हा गिरवला आहे. राजकारण किंवा समाजकारणाशी थेट संबंध नसलेल्या महिलेला सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणून नुरमहंमद शेख आणि हाजी परिवाराने आपल्या शब्दाची पक्की ओळख करून दिली आहे.

------------------- ​[ चौकट ] -----------------------------
लोकांनी माझ्या कामावर आणि थोरात-तांबे परिवाराच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. प्रभाग १० मधील जनतेने दिलेला हा कौल केवळ माझा नसून, सामान्य कार्यकर्त्याच्या जिद्दीचा विजय आहे. आम्ही दिलेला शब्द पाळला याचा सार्थ अभिमान आहे.

--नूरमोहम्मद पीरमोहम्मद शेख (नगरसेवक, संगमनेर)---


✍️कार्यकारी संपादक शौकत पठाण
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget