वडगावपान ऍसिड हंल्ला: पोलिसांनी प्रसिद्ध केले संशयित आरोपीचे रेखाचित्र
माहिती देण्याचे आवाहन पीडितेची प्रकृती स्थिर,पीडित मुलीवर प्रवरा मेडिकल ट्रस्ट (लोणी,) येथे उपचार सुरू;
संगमनेर प्रती; दि, 19 मार्च 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, वडगावपान येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या निर्घृण अॅसिड हल्ला प्रकरणातील अज्ञात आरोपीचे रेखाचित्र संगमनेर पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे. या संशयित नराधमाची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले आहे.
--------------नेमकी घटना काय ?------------------ दिनांक १७/०३/२०२६ रोजी वडगावपान येथील एक अल्पवयीन मुलगी सायकलवरून जात असताना, हाडकीचा ओढा कडून जाणाऱ्या महादेव मळ्याकडील कच्च्या रस्त्यावर एका अज्ञात इसमाने (वय अंदाजे ३२ ते ३५) तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. यावेळी त्याने सोबत आणलेल्या बाटलीतील अॅसिडसदृश्य द्रव पदार्थ मुलीच्या चेहऱ्यावर उजव्या बाजूने फेकून तिला गंभीर जखमी केले. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गु. र. नं. १२६/२०२६ नुसार बी. एन. एस. कलम १२४(१), १२६(२) प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर गुन्ह्याचा तपास वेगाने सुरु आहे. आरोपीला पकडण्यासाठी तांत्रिक विश्लेषण गुन्हे शोध पथक अहिल्यानगर, फॉरेन्सीक युनिट संगमनेर, संगमनेर शहर पोलीस स्टेशन आणि संगमनेर तालुका पोलीस स्टेशन या सर्वांची वेगवेगळी पथके तयार करून आरोपीचा शोध घेतला जात आहे. पीडित मुलीवर प्रवरा मेडिकल ट्रस्ट (लोणी, ता. राहता) येथे उपचार सुरू आहेत. तिची तब्येत सध्यातरी स्थिर आहे. येथे जनरल फिजिशियन, तज्ञ प्लास्टिक सर्जन आणि नेत्रतज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्यावर आवश्यक ते उपचार केले जात आहेत.
------------ पोलिसांचे जनतेला आवाहन -------- तपासादरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांशी चर्चा करून आणि त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार केले आहे. हे रेखाचित्र सोबत प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या रेखाचित्रातील अज्ञात आरोपीबाबत कुणाकडेही खात्रीशीर माहिती असल्यास किंवा कुणी त्याला ओळखत असल्यास त्यांनी खालील क्रमांकांवर तातडीने संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
------/-/--------संपर्क क्रमांक:-----/-/------- प्रविण साळुंखे (पोलीस निरीक्षक) - ९६८९९०३५८८ संगमनेर तालुका पोलीस स्टेशन - ०२४२५-२२५४३३ व्ही. एन. काळे (सहा. पोलीस निरीक्षक) - ९८२२३००२३३ महेश व्ही. शिंदे (पोलीस उपनिरीक्षक) - ९५२७९३०९९७
Post a Comment