पद नसतानाही जनसेवा गुड्डू इंजिनिअर यांच्या पाठपुराव्याला यश
पद नसतानाही जनसेवा गुड्डू इंजिनिअर यांच्या पाठपुराव्यामुळे लखमिपुरा येथील 'गटार चोकअप'चा प्रश्न मार्गी,
संगमनेर प्रति : दि.27 डिसेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, लखमिपुरा प्रभाग क्रमांक ११ मध्ये आज (२७ डिसेंबर २०२५) गटारे चोकअप झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत होते. मात्र, सामाजिक कार्यकर्ते मुजम्मिल उर्फ गुड्डू इंजिनिअर यांनी या तक्रारीची दखल घेत तातडीने पावले उचलली आणि अवघ्या काही तासांतच हा प्रश्न निकाली काढला.नागरीकांची तक्रार मिळताच गुड्डू इंजिनिअर यांनी संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. प्रशासकीय स्तरावर सतत पाठपुरावा केल्यामुळे काही तासांतच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि काम पूर्ण केले. कोणतेही राजकीय पद नसतानाही वॉर्डातील रस्ते, नाले आणि आरोग्यविषयक प्रश्नांवर त्यांचा सक्रिय सहभाग वाखणण्याजोगा आहे.समाजहिताची कामे करण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नसते, तर प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते. नगरपालिकेतील कामे असोत, हॉस्पिटल किंवा पोलीस स्टेशनशी संबंधित काम असो, मी सदैव नागरिकांच्या मदतीसाठी खांद्याला खांदा लावून उभा आहे. असे आवाहन मुजम्मिल शेख उर्फ (गुड्डू) इंजिनिअर यांनी केले आहे. सध्या लखमिपुरा भागात गुड्डू इंजिनिअर यांच्या या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. रस्ते, नाले आणि सामाजिक हिताच्या कामात त्यांचा असलेला पुढाकार हा इतर कार्यकर्त्यांसाठी आदर्श ठरत आहे.
Post a Comment