पोलीस कॉन्स्टेबल राहुल डोके यांचा नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते सन्मान!

राहुल डोके यांची उल्लेखनीय कामगिरी तपासातील कौशल्य: संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव;


​अहिल्यानगर: दि 09 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेत (LCB) कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल राहुल डोके यांनी विविध गुन्ह्यांचा यशस्वी तपास केल्याबद्दल, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मा. श्री. दत्तात्रय कराळे साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी महानिरीक्षकांनी डोके यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.संगमनेर उपविभागीय कार्यालयात असताना अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.अवैध धंद्यांवर लागोपाट कारवाया करणे आणि गुन्हेगारांची अचूक माहिती काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना कायद्याच्या पिंजऱ्यात उभे करण्याची कामगिरी त्यांनी केली आहे.काही महिन्यांपूर्वीच राहुल डोके यांची बदली संगमनेर उपविभागीय कार्यालयातून अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेत झाली आहे. त्यांच्या कामाचा अनुभव आणि कार्यक्षमता पाहूनच स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या या यशात इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले असून, आज संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget