कोपरगावमध्ये घरगुती गॅसची अवैध रिफिलिंग उघड,2 लाख 42 हजाराचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ५ जण जेरबंद! आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल;



​कोपरगाव (प्रतिनिधी) दि 11 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे साहेब यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने कोपरगाव शहरात मोठी कारवाई केली आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅस टाक्यांमधून वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.                            अशी झाली कारवाई 

जिल्ह्यात अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यांवर कारवाई करण्याच्या सूचना मिळाल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोवे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक कोपरगाव परिसरात तैनात करण्यात आले होते. पेट्रोलिंग दरम्यान पथकाला माहिती मिळाली की, मनोज चंद्रकांत गिरमे हा त्याच्या साथीदारांसह कोपरगाव ते संजीवनी कॉलेज रोडवरील एका कॉम्प्लेक्सच्या मागे अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत आहे. माहितीची खात्री पटताच, स्थानिक पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. यावेळी काही इसम कोणतीही सुरक्षितता न बाळगता गॅस टाक्यांमधून चारचाकी वाहनांमध्ये रिफिलिंग करताना रंगेहात सापडले.                        ताब्यात घेतलेले आरोपी:

१. मनोज चंद्रकांत गिरमे (वय ४५, रा. निवारा सोसायटी, कोपरगाव)
२. सिध्दार्थ संदिप गिरमे (वय २६, रा. निवारा सोसायटी, कोपरगाव)
३. मुज्जमिल जाकिर मन्यार (वय २२, रा. चांदवड, जि. नाशिक)
४. सद्दाम जाकिर मन्यार (वय २५, रा. चांदवड, जि. नाशिक)
५. फहिम हरुन शेख (वय ३०, रा. कोपरगाव)
जप्त केलेला मुद्देमाल (एकूण २,४२,०००/- रुपये):गॅस टाक्या: २२,००० रुपये किमतीच्या एच.पी. कंपनीच्या ८ टाक्या (५ भरलेल्या, ३ रिकाम्या).साहित्य: १५,००० रुपयांची इलेक्ट्रिक मोटार व रिफिलिंग पाईप्स. वजन काटा: ५,००० रुपयांचा इलेक्ट्रिक काटा. वाहने: २,००,००० रुपये किमतीच्या दोन चारचाकी गाड्या.जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल शासनाचा कोणताही परवाना नसताना, ज्वलनशील पदार्थांबाबत निष्काळजीपणा दाखवून लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ आणि जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ नुसार गुन्हा (गु.र.नं. ११/२०२६) दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि हरिष भोवे, पोउपनि दिपक मेढे, अंमलदार राहुल द्वारके, राहुल डोके, सतिष भवर, सुनिल मालणकर, भगवान धुळे आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे सपोनि ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या पथकाने केली. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत.

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget