देव व धर्माच्या कार्यात आपला हात कधीच आखडता राहिलेला नाही आणि राहणार नाही.आ.खताळ

मच्छिंद्रनाथगड देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जासाठी प्रयत्नशीलआ. अमोल खताळ; धर्मबीज निमित्त सप्ताहाची सांगता ;



संगमनेर प्रति: दि 21 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील मच्छिंद्रनाथगड मंदिर हेजागृत देवस्थान असून, या देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वप्रथम ‘क’ वर्ग देवस्थान दर्जामध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव तयार करावा. हा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मांडून मंजूर करून घेतला जाईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी मालदाडकरांना दिला.मालदाड येथील मच्छिंद्रनाथगडावर धर्मबीज निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहाची सांगता आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडी फोडून करण्यात आली. यावेळी महायुतीचे ज्येष्ठनेते परसराम नवले, परशुराम नवले, अमित नवले, सूर्यभान नवले, सोमनाथ नवले, कावेरी नवले, सरपंच गोरक्ष नवले, नितीन नवले, बाबाजी नवले, गणपत गुरकुले, लहानू नवले आदींसह महा युतीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार खताळ म्हणाले की, देव व धर्माच्या कार्यात आपला हात कधीच आखडता राहिलेला नाही. मालदाड येथील मच्छिंद्रनाथगडावर केवळ गावातूनच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्या तून भाविक दर्शनासाठी येतअसतात. त्यामुळे मच्छिंद्रनाथगडाकडे जाणार्या रस्त्याबाबत निश्चितच सकारात्मक विचार केला जाईल. मला लहानपणा पासूनच वारकरी संप्रदायाचा खूप अभिमान असल्यामुळे देव-धर्माचे कार्यक्रम कितीही उशिरा असले तरी मी ते टाळत नाही.भजन-कीर्तना सारख्या धार्मिक कार्यक्रमांतून सकारात्मक ऊर्जा मिळते व त्यातून आत्मिक समाधान लाभते, असेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.


.............................कोट.....................................
मालदाड गावासाठी आमदार अमोल खताळ यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. मच्छिंद्रनाथगड मंदिर देवस्थानच्या सभामंडपासाठी १० लाख रुपये दिले असून, देवस्थानकडे जाणारा रस्ता खराब झाल्यामुळे तो कोणत्याही निधीच्या माध्यमातून काँक्रीटीकरण करावा.
सूर्यभान नवले (महायुतीचे नेते)


............... ..............चौकट..................................
काकडवाडी येथील शरद महाराज ढवळे हे लहान मुलांसाठी वारकरी शिक्षण संस्था चालवित आहेत. या संस्थेतील अनाथ मुलांसाठी आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून २२ गाद्या व उशा भेट देण्यात आल्याची माहिती स्वतः शरद महाराज ढवळे यांनी मालदाड येथील मच्छिंद्रनाथगडावरील धर्मबीज निमित्त आयोजित सप्ताहाच्या सांगता प्रसंगी दिली. यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत केले.
........................................................................

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget