नगरपरिषदेकडून ५ ते ७ मार्च दरम्यान थेट मतदानाचे आयोजन. हे स्मारक सर्वांच्या पसंतीचे असावे ;
संगमनेर (प्रति):दि.४ मार्च २०२६ रोजी मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या व अस्मितेचे केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीसाठी संगमनेर नगरपरिषदेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. बसस्थानकासमोरील प्रस्तावित स्मारकाचे स्वरूप नेमके कसे असावे, यासाठी शहरातील नागरिकांचे थेट मत जाणून घेण्याकरिता दि. ५ ते ७ मार्च २०२६ रोजी दरम्यान विशेष मतदान प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी दिली आहे.बसस्थानकासमोरील १५ बाय १५ मीटरची मोक्याची जागा स्मारकासाठी मिळावी, यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजीत तांबे यांनी १८ डिसेंबर २०२३ पासून राज्य शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेने ही जागा आता नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आली असून, यामुळे स्मारकाचा मार्ग प्रशस्त झाला आहे.स्मारकाच्या स्वरूपाबाबत शहरातील शिवप्रेमींमध्ये विविध मते आहेत. कोणाला 'अश्वारूढ' स्मारक हवे आहे, तर कोणाला 'सिंहासनाधीश्वर' किंवा 'उभे पूर्णाकृती' स्मारक हवे आहे. नागरिकांच्या या भावनांचा आदर करत नगरपरिषदेने लोकसहभागातून निर्णय घेण्याचे ठरवले आहे
१)पूर्णाकृती उभे स्मारक २) पूर्णाकृती सिंहासनाधीश्वर स्मारक ३) पूर्णाकृती अश्वारूढ स्मारक स्थळ: संगमनेर बसस्थानक, सुप्रीम पावभाजी समोर. कालावधी: ५, ६ आणि ७ मार्च २०२६. नागरिकांसमोर स्मारकाच्या तीन संभाव्य ३डी (3D) प्रतिमा ठेवल्या जाती शहराच्या मध्यवर्ती भागात छत्रपतींचे प्रेरणादायी स्मारक उभे राहणार आहे. हे स्मारक सर्वांच्या पसंतीचे असावे, या उद्देशाने आम्ही ही मतदान प्रक्रिया राबवत आहोत. संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले अमूल्य मत नोंदवावे," असे आवाहन संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment