छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त संगमनेर दुमदुमणार!

भव्य शिवजन्मोत्सव सोहळा व ऐतिहासिक मिरवणूक


संगमनेर प्रति; दि 4 मार्च2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, हिंदू समाज व शिवसेना-भाजपा महायुती, संगमनेर यांच्या वतीने शुक्रवार दिनांक ६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त संपूर्ण शहरातून दिमाखदार मिरवणूक काढण्यात येणार असून शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या भव्य मिरवणुकीची सुरुवात संगमनेर नगरपरिषद येथून होणार आहे. त्यानंतर मिरवणूक लालबहादूर शास्त्री चौक, बाजारपेठ, तेली खुंट, सय्यद बाबा चौक, मेन रोड, चावडी, अशोक चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्गे पुढे जात बसस्थानक येथे सांगता होणार आहे. संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी, फुलांची सजावट आणि शिवमय वातावरणाची निर्मिती करण्यात येणार आहे.मिरवणुकीत विविध पारंपरिक व ऐतिहासिक देखावे सादर केले जाणार असून त्यामध्ये सनई-चौघडे, शिवछत्रपती गौरव पालखी, अश्वदर्शन, हिंदू जनजागृती घोष पथक, मर्दानी खेळ, तसेच आदि योगी महादेव यांचा देखावा यांचा समावेश असणार आहे. याशिवाय अफजलखान वधाचा जिवंत देखावा विशेष आकर्षण ठरणार असून अघोरींचा देखावा, किंग स्टार ब्रास बँड पथक (मावळ) आणि एकलव्य ढोल-ताशा पथक यांच्या दमदार सादरीकरणामुळे वातावरण शिवमय होणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण संगमनेर दुमदुमून जाणार आहे.शिवसेना-भाजपा महायुतीच्या वतीने संगमनेरमधील सर्व शिवप्रेमी, युवक, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर करण्यासाठी तसेच नव्या पिढीपर्यंत स्वराज्याचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget