अन्यायाशी दोन हात करणारी लेखणी आणि कॅमेरा, न्यू मुळा प्रवरा आणि न्यूज NMP कडून दिवाळीचा खास कृतज्ञता' संदेश;
संगमनेर प्रति: दि.21 ऑक्टोबर 2025 दीपावली म्हणजे प्रकाशाचा उत्सव. परंतु, गेल्या १८ वर्षांपासून जनसामान्यांच्या जीवनातील समस्यांचा अंधार दूर करत, त्यांच्या प्रश्नांना सातत्याने शासन दरबारी 'प्रकाशात' आणण्याचे व्रत घेतलेल्या साप्ताहिक न्यू मुळा प्रवरा आणि सात वर्षांपासून अन्याय-अत्याचाराविरोधात लढणाऱ्या मराठी वाहीनी न्यूज NMP चॅनल ने आपल्या लाखो वाचक आणि प्रेक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. साप्ताहिक मुळा प्रवराचा उगम म्हणजे या नावाने साप्ताहिक वृत्तपत्र पहिला अंक सन 1995 मधे सार्वमत चे संपादक स्वर्गीय वसंतराव देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करून झाला होता. 1995 ते 2005 पर्यंत संपादक गुलाब भाई शेख यांनी तो प्रवास स्वतःच केला त्यानंतर 2006 मध्ये साप्ताहिक न्यू मुळा प्रवरा हे वृत्तपत्र कार्यकारी संपादक शौकत पठाण यांच्या मागणीवर नवी दिशा नवीन आशा म्हणून प्रकाशित करण्यात आले आणि ते आज तयागत सातत्याने सुरू देखील आहे,
गुलाब भाई शेख यांच्या नेतृत्वाखालील या माध्यम समूहाने आपला हा प्रवास केवळ बातमीदारी म्हणून नव्हे, तर 'जनतेचा लढा म्हणून केला आहे. 'निष्पक्ष' आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून कित्येक पीडितांना न्याय मिळवून देण्यात संस्थेला यश आले आहे. या प्रवासाचा उल्लेख करताना संस्थेने अत्यंत भावनिक आभार मानले आहेत.
यावेळी संस्थेचे मुख्य संपादक गुलाब भाई शेख म्हणाले, आम्ही करत आलेले हे कार्य केवळ पत्रकारिता नाही, तर श्रेयाची शर्यत आहे. आणि या शर्यतीत आमच्या संघर्षापेक्षा तुमच्या सारख्याच वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या अत्यंत मोलाच्या साथीचा वाटा मोठा आहे. तुमचा विश्वास हाच आमचा खरा दिवाळी बोनस आहे.
या शुभ मुहूर्तावर, कार्यकारी संपादक शौकत पठाण, सह संपादिका बानोबी शेख, आणि संपूर्ण टीमच्या वतीने समस्त वाचकांच्या कुटुंबियांना समृद्धी, धैर्य आणि यशाची कामना करण्यात आली आहे. यावेळी या शुभ दीपावलीच्या मंगलमय मुहूर्तावर, संस्थेचे मुख्य संपादक गुलाब भाई शेख, कार्यकारी संपादक शौकत पठाण, सह संपादिका बानोबी शेख, संगमनेर तालुका सह संपादक जमीर शेख उर्फ बाबू पाकीजा, घारगाव पठार भाग सहसंपादक वसीम सय्यद, अकोले संगमनेर प्रतिनिधी युसुफ शेख, पुणे प्रतिनिधी आरिफ इनामदार, महिला प्रतिनिधी निकहत मुंढे, तसेच महाराष्ट्रभरातील सर्व प्रतिनिधी यांच्या वतीने वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या कुटुंबाला
- धनलक्ष्मी (संपत्ती)
- धान्यलक्ष्मी (समृद्धी)
- धैर्यलक्ष्मी (न घाबरता संकटांना सामोरे जाण्याचे बळ)
- शौर्यलक्ष्मी (पराक्रम)
- विद्यालक्ष्मी (ज्ञान)
- कार्यलक्ष्मी (कामामध्ये यश)
- विजयालक्ष्मी (विजय)
- राजलक्ष्मी (सन्मान व प्रतिष्ठा) अष्टलक्ष्मींच्या' कृपेचा आशीर्वाद मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली,
✍️ कार्यकारी संपादक: शौकत पठाण

Post a Comment