जावेद जागीरदार यांच्या प्रयत्नांमुळे लखमीपुरा कब्रस्तानचे रखडलेले काम १५ दिवसांत पूर्ण
स्थानिकांच्या निवेदनांकडे कुणी केले होते दुर्लक्ष? अवघ्या १५ ते २० दिवसांत कसे झाले काम पूर्ण?
संगमनेर प्रति: दि,19 सप्टेंबर2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार शहरातील नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या लखमीपुरा मुस्लिम कब्रस्तानच्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या सुशोभीकरण कामाला अखेर यश आले आहे. विशेष म्हणजे, अनेक वर्षे केवळ आश्वासनांवर राहिलेले हे काम माजी उपनगराध्यक्ष जावेद भाई जागीरदार यांच्या पुढाकाराने अवघ्या १५ ते २० दिवसांत पूर्ण झाले. या कामात कब्रस्तानमधील लाईटिंग आणि रस्त्यांची दुरुस्ती यांचा समावेश आहे.स्थानिकांच्या निवेदनांकडे दुर्लक्ष
यापूर्वी स्थानिक रहिवाशांनी अनेक वेळा नगरपालिका, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदने व तक्रारी अर्ज दाखल केले होते, परंतु त्याची कधीही दखल घेतली गेली नाही. यानंतर, लखमीपुरा येथील रहिवासी इरफान पठाण (पप्पू) आणि गफ्फार शेख यांनी जावेद भाई जागीरदार यांची भेट घेऊन कब्रस्तानचे काम मार्गी लावण्याची विनंती केली. जागीरदार यांनी तात्काळ हे काम हाती घेतले आणि ते यशस्वीरित्या पूर्ण केले.नगरपालिकेच्या माध्यमातून काम
हे काम संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आले असून, यात इरफान पठाण (पप्पू) आणि गफ्फार शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हे काम पूर्ण झाल्यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.या कौतुकास्पद कामाबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी, लखमीपुरा ट्रस्ट आणि परिसरातील स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत जावेद भाई जागीरदार यांचा सत्कार केला. यावेळी जिलानी शेख (बाबा भाई), शकुर शेख, रऊफ शेख, नासिर खान, परवेश सय्यद, अजिज शेख, मोबीन शेख, अशपाक शेख, मजहर भाई शिव सेना आणि अब्दुल बारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.तर गुड्डू इंजिनिअर (मुजंम्मील शेख यांनी मा.जावेद भाई जहागीरदार यांचे समस्त समाजबांधवांच्या वतीने आभार देखील मानले आहे,
Post a Comment