संगमनेर करांनी सॅफ्रोन उत्सवाच्या माध्य मातून खरेदीचा आनंद घ्यावा-आ खताळ
लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रोन सफायरच्या सॅफ्रोन उत्सवाचा शुभारंभ,धर्मासाठी आणि देशासाठी काही गोष्टी बाजूला ठेवून पुढे येणे गरजेचे,आ,खताळ;
संगमनेर प्रति: ज्याप्रमाणे लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरच्या वतीने जानेवारी महिन्यात बिजनेस एक्सप्रेस भरविला जातो त्या एक्स्पोला लाखोंनी संगमनेरकर सहभागी होऊन खरेदीचा आनंद घेत असतात असाच खरेदीचा आनंद सॅफ्रोन उत्सवा च्या माध्यमातून संगमनेरकरांनी घ्यावा असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे,नवरात्र आणि दिवाळीचे औचित्य साधून लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रोन सफायरच्या वतीने दिनांक 12 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर च्या पाच दिवस मालपाणी लॉन्स या ठिकाणी फन फूड व शॉपिंग सॅफ्रोन उत्सव आयोजित करण्यात आला आहे या शॉपिंग सॅफ्रोन उत्सवाचे उद्घाटन आ अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जीएटी कोऑर्डिनेटरसुनिता मालपाणी, क्लबचे संस्थापक अध्यक्ष पीएमसीसी एमजेएफ गिरीश मालपाणी प्रकल्प समन्वयक श्रीनिवास भंडारी अध्यक्ष आणि प्रकल्प प्रमुख कल्याण कासट प्रकल्प प्रमुख अतुल अभंग पूजा मर्दा कृतिका पडतानी सचिव सुमित मनियार खजिन दार नामदेव मुळे आदी मान्यवर उपस्थित होते,आमदार खताळ म्हणाले की लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरच्या वतीने जानेवारी महिन्यात होणाऱ्या बिझनेस एक्सपोसाठी लायन्स क्लब सफायरवर विश्वास ठेवून पुणे नाशिक आणि मुंबई या ठिकाणाहून व्यावसायिक संगमनेरला येत असतात. या एक्सपोला लाखोच्या संख्येने संगमनेरक नागरिक भेट देत असतात आणि खरेदी करत असतात त्यामुळे निश्चितच त्या व्यवसायिकाला आपला माल विकला गेला असल्याचा आनंद होत असतो. यावर्षी लायन्स क्लब सफायर सॅफ्रोनच्या वतीने प्रथमच पाच दिवसीय हा सॅफ्रोनउत्सव भरविला असून पुणे नाशिक मुंबई आणि संगमनेर येथून जवळजवळ ८० स्टॉल बुकिंग झालेआहे हे एकूण मनाला समाधान वाटले आहे तुमच्यावर एक विश्वास ठेवून हे सर्वस्टॉल धारक सहभागी झालेले आहेत. त्यांना निश्चितच या सॅफ्रोन उत्सवाचा फायदा होईल असा आशावाद आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
-----------------------------चौकट------------------------------------- लायन्स क्लब सफायरचे नाव राम मंदिर झाल्यानंतर बदलून ते सॅफ्रोन करण्यात आले असल्याचे एकूण तुम्ही भगव्याचे काम सुरू केले आहे ही चांगली गोष्ट आहे धर्मासाठी आणि देशासाठी काही गोष्टी बाजूला ठेवून पुढे येणे गरजेचे असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
यावेळी लायन्स क्लब सफायरचे प्रमुख गिरीश मालपाणी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुनिता मालपाणी सॅफ्रोन सफायर चे अध्यक्ष कल्याण कासट यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रकल्प प्रमुख अतुल अभंग यांनी केले स्वागत लायन्स क्लबचे प्रमुख गिरीश मालपाणी यांनी केले सूत्रसंचालन सुदीप हासे यांनी केले तर आभार सचिव सुमित मणियार यांनी मानले या प्रकल्पासाठी प्रकल्प समिती सदस्य महेश डंग धनंजय धुमाळ उमेश कासट ,राजेश रा मालपाणी सुदीप हासे प्रशांत गुंजाळ अक्षय गोरले देविदास गोरे जितेश लोढा रोहित मणियार चंद्रशेखर गाडे अजित भोत निलेश ओहरा अनिरुद्ध डिग्रसकर सुमित अट्टल कृष्णा असावा संतोष अभंग डॉ योगेश गेठे वेंकटेश लाहोटी नयन पारखं अतुल कोटकर आदित्य कडलग धनंजय फटांगरे नम्रता अभंग प्रियंका कासट चैताली जोर्वेकर मीनल अभंग यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment