मनसे विद्यार्थी सेनेच्या दणक्याने संगमनेर आगार प्रमुख नरमले
विद्यार्थ्यांच्या गैरसोयीवर मनसेचा 'गुंड' साहेबांना जाब; बससेवेतील त्रुटी त्वरित दूर करण्याची ग्वाही;
संगमनेर प्रति: दि 1 ऑक्टोबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (MSRTC) बससेवेतील मनमानीचा मोठा फटका बसत होता. वारंवार बस लेट होणे, रद्द होणे किंवा डिझेल नसल्याचे कारण देत सेवा थांबवण्याच्या गंभीर तक्रारी वाढल्या होत्या. यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा मुद्दा उचलत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (MNVS) संगमनेर आगार प्रमुखांना कडक शब्दांत निवेदन दिले आहे, ओझर, उंबरी, आश्वी, प्रतापूर, दाढ, हसनापूर अशा अनेक गावांसाठी आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा बस मिळत नव्हती. बससेवा विस्कळीत झाल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा-कॉलेज गाठणे अशक्य झाले होते. या गंभीर गैरसोयीची दखल घेत मनसे विद्यार्थी सेनेने आगार प्रमुख श्री. गुंड साहेब यांना भेटून जाब विचारला.मनसे विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्यांचा पाढा वाचताच आगार प्रमुख श्री. गुंड साहेब यांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी यापुढे बससेवेतील अशा प्रकारच्या त्रुटी पुन्हा उपस्थित होणार नाहीत, तसेच वेळेवर बस उपलब्ध करून दिली जाईल, अशी ठाम ग्वाही मनसे पदाधिकाऱ्यांना दिली. सदर निवेदन देता वेळी उत्तर अहिल्यानगर मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संकेत लोंढे, संगमनेर मनसे तालुका उपाध्यक्ष सुरजभाऊ तळेकर, विभाग अध्यक्ष कुणाल भुसाळ, यश भुसाळ, सार्थक खेमणर, तुषार मगर, अमोल आंधळे, साहिल रणदीर, प्रतीक पंडित व इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसेच्या या दणक्यानंतर आता ग्रामीण भागातील बससेवा सुरळीत होणार का, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment