बड्या प्लास्टिक माफियांचे हात बांधले, गरीब हातगाडीवाल्यांना वेठीस धरले! शहरात प्लास्टिकचा मोठा साठा आणत कोण?
संगमनेर प्रति: दि.15 ऑक्टोबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर शहराला प्लास्टिकमुक्त करण्याच्या नावाखाली नगरपालिकेने जी 'कारवाईची मोहीम' हाती घेतली आहे, तिला 'प्रदूषणमुक्ती'चा मुखवटा आणि आतून 'पठाणी वसुली' असे स्वरूप आले आहे. बाजारात सुरू असलेल्या या पक्षपाती कारवाईमुळे शहरातील छोटे व्यापारी आणि फेरीवाले अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत, तर प्लास्टिकचा खरा साठा करणारे ठोक (होलसेल) व्यापारी अजूनही 'सेफ झोन'मध्ये आहेत!प्रदूषण आणि कचरा पसरवण्यास जबाबदार असलेल्या मूळ पुरवठादारावर कारवाई करण्याऐवजी, पालिका अधिकारी हातगाडीवाले, पथविक्रेते, आणि भाजी विक्रेते अशा दुर्बळ घटकांवर धाडी टाकत आहेत. या कारभारातून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होतात.
👉 उत्पादकांवर 'अभय' का?
शहरातील मुख्य बाजारात आणि गोदामांमध्ये जो प्लास्टिक पिशव्यांचा मोठा साठा येतो, त्यावर कारवाई का होत नाही? 'होलसेल' व्यापाऱ्यांवर हात टाकायला प्रशासन घाबरत आहे की त्यांना 'शविशेष अभय' दिले जात आहे? जर प्लास्टिकचे मोठे पुरवठादार धाकधुकीत आले, तर आपोआपच छोट्या विक्रेत्यांपर्यंत हा माल पोहोचणे थांबेल. पण, पालिकेने हा सोपा मार्ग सोडून केवळ दंड वसुलीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे 'प्लास्टिक माफियांचे हित' जपले जात आहे, हे स्पष्ट दिसते. टारगेट फक्त गरीब १००-२०० रुपयांची कमाई करणाऱ्या गरीब विक्रेत्यांना मोठा दंड ठोठावला जातो, ज्यामुळे त्यांची उपजीविका धोक्यात येते. पालिका या दुर्बळ घटकांविरुद्ध कारवाई करून पोकळ आकडेवारी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. शहरातील नागरिकांचे आणि छोट्या व्यापाऱ्यांचे स्पष्ट मत आहे की, या कारवाईमागे प्रदूषणमुक्तीची तळमळ कमी आणि तात्काळ वसुलीचा हेतू जास्त आहे. नगरपालिकेने तात्काळ हा 'तोलामोला'चा खेळ थांबवावा आणि आपले संपूर्ण लक्ष शहरात प्लास्टिक आणणाऱ्या व विकणाऱ्या ठोक व्यापाऱ्यांवर केंद्रित करावे.ज्या दिवशी बड्या व्यापाऱ्यांची गोडाऊन सील होतील, त्या दिवशीच संगमनेर शहर प्लास्टिकमुक्त होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकेल अन्यथा, हा केवळ पठाणी दंड वसूल करण्याचा कार्यक्रम आहे, यात शंका नासावी,बड्या प्लास्टिक माफियांचे हात बांधले, आणि गरीब हातगाडीवाल्यांना वेठीस धरले जात असल्याने शहरात प्लास्टिकचा मोठा साठा कोण आणतो, याचा शोध नाही फक्त 'गरिबांना दंड' ठोकून पोकळ आकडेवारी दाखवाची, बड्या प्लास्टिक माफियांचे हात बांधले, गरीब हातगाडीवाल्यांना वेठीस धरले! शहरात प्लास्टिकचा मोठा साठा आणत कोण? याकडे मात्र पालिकेचं सर्रास आणि दुर्लक्ष असल्याचा नागरिकांच्या चर्चेतून आरोप होत असताना दिसून येत आहे त्यामुळे आता पालिका प्रशासन अधिकारी मोठ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे
Post a Comment