स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ठाकरेंची ताकद दाखवून देऊ,सचिन कोते जिल्हा प्रमुख उत्तर नगर.निवडणुकीत सच्च्या शिवसैनिकांना उमेदवारी मिळणार;
संगमनेर प्रति:दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, ठाकरेंच्या शिवसेनेने शिर्डी लोकसभेच्या जिल्हाप्रमुख पदी सचिन कोते पाटील व जगदीश चौधरी यांची नियुक्ती केल्या नंतर प्रथमच काल दि.14 रोजी सायंकाळी 05 वाजता संगमनेर येथे आले असता नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मार्गदर्शनात शिवसैनिक अमर कतारी यांच्या पुढाकारातून संगमनेर शासकीय विश्रांती गृह येथे सदरील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उत्तरेत झालेल्या संघटनात्मक बदलामुळे युवासैनिक व महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला आहे.
तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातूनही शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शवल्याने जुनी मरगळ झटकून ठाकरेंचे निष्ठावान शिवसैनिक आता रणांगणात उतरल्याचे दिसून आले. यावेळी नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख तथा शिर्डी साईबाबा मंदिर माजी विश्वस्त सचिन कोते पाटील यांचा तसेच निष्ठावान ज्येष्ठ शिवसैनिक व नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख जगदीश चौधरी यांचा संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांचे स्वागत करतांना आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सच्च्या शिवसैनिकांना उमेदवारी देऊन निष्ठावंताचा सन्मान करण्याचे व आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शक्यतो महाविकास आघाडी म्हणून आणि महाविकास आघाडी नाही झाली तर संपूर्ण ताकतीने सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे व त्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन सचिन कोते यांनी दिले आहे.
तसेच जगदीश चौधरी यांनी देखील सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन केले आपली ताकद ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी माविकास आघाडीचे नेते सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे शरद पवार साहेब व सन्माननीय नेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्याकडून आपल्या शिवसैनिकांना न्याय मिळवून देऊ शिवसैनिकांनो तयारीला लागा आपले उमेदवार निवडून आलेच पाहिजे असे आवाहन अमर कतारी यांनी केले यावेळी श्रीरामपूर येथून आलेले अशोक मामा थोरे व कोपरगाव येथील भारत भाऊ मोरे यांनी देखील शिवसैनिकांना मार्गदर्शन केले कोपरगाव येथील ज्येष्ठ शिवसैनिक असलम भाई शेख व पैलवान गगन हाडा शुभम वाघ देखील उपस्थित होते प्रास्ताविक दीपक साळुंखे यांनी केले व आभार असिफ तांबोळी यांनी मानले तसेच स्वागत युवा सेनेचे अमित भाऊ चव्हाण फैसल सय्यद अक्षय गुंजाळ गोविंद नागरे योगेश खेमनर राजू सातपुते वैभव अभंग अक्षय गाडे अमोल डुकरे सचिन साळवे यांच्या वतीने करण्यात आले,
यावेळी महिला तालुकाप्रमुख शितलताई हासे भाऊसाहेब हासे पठार भाग तालुका प्रमुख संजय फड ईम्तियाज शेख रहीम बेग अल्ताफ शेख सदाशिव हासे आश्वी चे युवा नेते प्रकाश राजे गायकवाड रंगनाथ फटांगरे पप्पू कानकाटे मुस्लिम मावळा अजीज मोमीन रिक्षा सेनेचे अशोक बडे व रिक्षा सेनेचे अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय भाऊ सातपुते सचिन धनवटे बाळासाहेब कवडे प्रभाकर गेठे. लांडगे साहेब प्रशांत खजुरे प्रकाश चोथवे अनिल खुळे पूजा कतारी सुंनंदा कतारी काजल राठोड लक्ष्मी खिची सुगरिता खिची मनवा तडासम मीनाक्षी मसराम संगीता खजुरे मनीषा खजुरे साधना पवार मोहिनी कतारी गौरी राजगोड गुड्डी पवार दीपक वनम महमूद भाई मुसा भाई मोहसीन शेख व वैशाली ताई वढतल्ले व महिला कार्यकर्ते तसेच नगरपालिका पंचायत समिती साठी इच्छुक उमेदवार देखील मोठ्या संख्येने इच्छुक उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक साळुंखे यांनी केले, तर आभार असिफ तांबोळी यांनी मानले.
✍️सा.न्यु मुळा प्रवरा
Post a Comment