जगद्गुरू स्वामी रामानंदाचार्य उर्फ नरेंद्राचार्य महाराज यांचा रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधामला 21ऑक्टोबर 2025 रोजी जन्मसोहळा होत आहे. त्या निमित्त उत्तर महाराष्ट्रातून हजारो भाविक भक्त सहभागी असलेली वसुंधरा पायी दिंडीचे 29 सप्टेंबर 2025 रोजी उत्तर महाराष्ट्र नाशिक उपपीठ येथून प्रस्थान झाले आहे. ही दिंडी उत्तर आहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे आली असता आ अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी या दिंडीचे संगमनेर शहरात उत्स्फूर्त स्वागत केले.तसेच चंदनापुरी येथील सिंधू लॉन्स येथे आमदार अमोल खताळ यांनी स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या सिद्धपादुकाचे दर्शन घेतले.त्यांच्या हस्ते व उत्तर अहिल्यानगर नगर जिल्ह्या तील भावीकभक्तांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले,या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे दिंडी प्रशासन प्रमुख सुभाष सानप ,उत्तर नगर जिल्हा निरीक्षक दादासाहेब मते उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सयाजी भडांगे संगमनेर तालुकाध्यक्ष प्रकाश बेलापूरकर राजशिष्टाचारप्रमुख व्यंकटेश बप्पा यांच्या सह अनेक भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते,
स्वामी नरेंद्राचार्य महाराज भक्तांना मार्गदर्शन करताना आ .खताळ म्हणाले की एक पेड आई के नाम ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पुढे आली आहे आणि त्या संकल्पनेच्या आधारावरती स्वामी नरेंद्राचार्य महाराज भक्तगणांनी पर्यावरणाविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी वसुंधरा पायी दिंडी हा उपक्रम सुरू केला आहे. तो एकदम स्तुत्य उपक्रम आहे स्वामी नरेंद्रा चार्य महाराज यांचा तुमच्या आमच्यावर कृपाशीर्वाद आहे.त्यांनी व त्यांच्याभावीक भक्तांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी काम सुरू केले आहे त्याचेच फळ विधानसभा निवडणुकीत मिळाले आहे. आणि माझ्या सारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला या तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी या संप्रदायातील भाविक भक्तांमुळे मिळालीआहे. या वृक्षदिंडीमध्ये लहानांपासून ज्येष्ठापर्यत आणि महिलां पासून पुरुषांपर्यंत सर्वच जण भक्तिमय वातावरणात सहभागी झाले आहे. मात्र या दिंडीमध्ये महिलांचा सहभाग जास्त प्रमाणात दिसून येत आहे नारीशक्तीच्या माध्यमातून देशाची व धर्माची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे आ. खताळ यांनी सांगितले,
Post a Comment