निवडणुकांपूर्वी पोलिसांचा 'चॅप्टर' अॅक्शनचा दणका ;

नवीन कायद्यातील अधिकारांचा प्रभावी वापर; बंधपत्र तोडणाऱ्या श्रीरामपूर विभागातील १६ सराईत गुन्हेगारांची थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी;


श्रीरामपूर प्रति: दि 15 नोव्हेंबर रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार,आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर मोठी व कठोर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून मिळालेल्या अधिकारांचा प्रभावी वापर करत, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी १६ सराईत गुन्हेगारांना थेट न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. चांगल्या वर्तणुकीसाठी बंधपत्र (Chapter Cases) न देणाऱ्या व बंधपत्राचे उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगारांवर राज्यातील ही अत्यंत मोठी आणि प्रभावी कारवाई मानली जात आहे.

​                        काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार (दि. २८/०६/२०२४) अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२६ ते १२९ खालील ‘चॅप्टर केसेस’ आणि बंधपत्रे (Bonds for Good Behaviour) न पाळणाऱ्यांवरील खटले त्यांच्यापुढे चालतात. मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे साहेब यांच्या आदेशानुसार, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या गुन्हेगारांवर ५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, त्यांचे प्रस्ताव BNSS कलम १२९ अन्वये कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक यांच्यापुढे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.                     

                            कारवाईची कारणे:

उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जयदत्त भवर (श्रीरामपूर), श्री. कुणाल सोनवणे (संगमनेर) आणि श्री. अमोल भारती (शिर्डी) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस स्टेशनकडून आलेले प्रस्ताव कार्यकारी दंडाधिकारी यांच्यापुढे सुनावणीसाठी ठेवण्यात आले. सुनावणी अंती, १६ गैरअर्जदार/प्रतिवादींना कोठडीत पाठवण्यात आले.

या १६ गुन्हेगारांना कोठडीत पाठवण्याची दोन प्रमुख कारणे:


​१.  काही गैरअर्जदार/प्रतिवादी यांनी चांगल्या वर्तणुकीसाठी बंधपत्र करून देण्यासाठी सक्षम जामीनदार हजर केले नाहीत.
२.  काही गुन्हेगारांनी यापूर्वी बंधपत्र दिल्यानंतरही, त्या कालावधीत पुन्हा गंभीर गुन्हे करून बंधपत्राचे उल्लंघन केले.
​       
पोलीस स्टेशननिहाय आकडेवारी:
​या १६ गुन्हेगारांना पुढीलप्रमाणे पोलीस स्टेशननिहाय न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे
:

अ.नं. पोलीस स्टेशन न्यायालयीन कोठडीत पाठवीलेल्या गैरअर्जदार / प्रतिवादी यांची संख्या

                    १ श्रीरामपूर शहर ५
                     २ संगमनेर शहर ३
                     ३ कोपरगाव शहर ३
                     ४ लोणी ३
                     ५ राहुरी २
                     एकुण   १६

कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नवीन कायद्याचा प्रभावी वापर💪

अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे यांनी कार्यकारी दंडाधिकारी म्हणून मिळालेल्या अधिकारांचा वापर करत, निवडणुकीच्या तोंडावर गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण केला आहे. नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता लागू झाल्यानंतर, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करण्यात आल्यावर रेकॉर्डवरील गुन्हेगारांना एकत्रितपणे न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याची, राज्यातील ही पहिली मोठी व अत्यंत प्रभावी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांमध्ये प्रचंड धसका निर्माण झाला आहे.


✍️: सा.न्यु मुळा प्रवरा संगमनेर

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget