आमदार खताळ यांची दादागिरी यशस्वी,संगमनेरला औद्योगिक वसाहतीसाठी पुढील आठवड्यात बैठक-मंत्री सामंत यांची ग्वाही
तमाशा कलावंत कोंडीराम आवळे मास्तर कांताबाई सातारकर स्मृति पुरस्काराने सन्मानित,त्याच भूमीत झालेला सन्मान मोठा असल्याची भावना;
संगमनेर.प्रति: दि नोव्हेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार,राज्यातील कर्तबगार लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण केलेल्या आमदार अमोल खताळ यांच्या मागणीला अखेर मूर्त रूप मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. संगमनेर तालुक्यात औद्योगिक वसाहत (MIDC) स्थापन करण्याच्या त्यांच्या मागणीसाठी पुढील आठवड्यातच विशेष बैठक घेण्याची ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली आहे. ज्येष्ठ तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर यांच्या स्मरणार्थ आयोजित पहिल्या राज्यस्तरीय पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.पहिला कांताबाई सातारकर स्मृति पुरस्कार
आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्या राज्यस्तरीय 'कांताबाई सातारकर स्मृति पुरस्कारा'ने साताऱ्याच्या वाई येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत कोंडीराम आवळे मास्तर यांना सन्मानित करण्यात आले. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रु. 21000 हजार- मानधन देऊन आवळे मास्तर यांचा गौरव करण्यात आला,पुरस्कार स्वीकारताना आवळे मास्तर यांनी आपल्या 80 वर्षांच्या कारकिर्दीतील हा पहिला पुरस्कार असून, ज्या भूमीत कलेची सेवा केली, त्याच भूमीत झालेला सन्मान मोठा असल्याची भावना व्यक्त केली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी बोलताना आमदार खताळ यांच्या कार्यशैलीचे अनोख्या शब्दांत कौतुक केले. सरकारमधील मंत्र्यांकडून कामे कशी दादागिरीने मंजूर करून घ्यायची, हे अमोल खताळ यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. अंगावर 'जळू' जसा चिकटून राहतो, तसा राजकीय 'जळू' अमोल खताळ यांच्याकडे आहे," असे सांगत त्यांनी खताळ यांची मागणी नाकारणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. युवकांच्या रोजगारासाठी खताळ यांची असलेली धडपड पूर्णत्वास नेण्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नसल्याचे आश्वासनही सामंत यांनी दिले.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आमदार खताळ यांच्या माध्यमातून लोककलावंतांचा झालेला सन्मान सोहळा तालुक्याची नवी ओळख निर्माण करणारा ठरला असल्याचे गौरवोद्गार काढले. बाकीचे उद्योग तालुक्यात आता बंद झाले, असा टोला लगावत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला आणि औद्योगिक वसाहतीसाठी आपणही पाठपुरावा करू, असे जाहीर केले. तसेच, जिल्ह्याच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मराठी भाषा व सांस्कृतिक भवन उभारणीसाठी जागा देण्याची मागणी त्यांनी केली. आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यात नवसांस्कृतिक पर्व निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले आणि औद्योगिक वसाहतीच्या घोषणेला मंत्री सामंत यांनी मूर्त स्वरूप देण्याची मागणी केली. सोहळ्यात व्यासपीठावर पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश चंदनशिवे, शाहीर विठ्ठल उमप यांच्या कन्या संगीता आणि कविता उमप, प्रा. एस. झेड. देशमुख, बापुसाहेब गुळवे, डॉ. सोमनाथ मुटकुळे यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी व साहित्य-कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment