कचरा गाडी ड्रायव्हरची 'दहशत'! हॉटेल व्यावसायिकांकडून सक्तीची वसुली?

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल विरोध करणाऱ्यांना मारहाण; पालिका प्रशासनाकडे केली तक्रार,प्रति हॉटेल 1500 रुपये?


​संगमनेर प्रति: दि 03 नोव्हेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, शहरात नगरपालिकेच्या कचरा घंटागाडीचा ड्रायव्हर दबंगगिरी करत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिवाळीच्या तोंडावर या ड्रायव्हरने शहरातील अनेक हॉटेल व्यावसायिकांकडून सक्तीने प्रति हॉटेल 1500 रुपये याप्रमाणे सुमारे तीन लाख रुपयांच्या आसपास रक्कम वसूल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.ही एक प्रकारे 'हप्ता वसुली सुरू असून, पैसे न दिल्यास हॉटेलमधील कचरा न उचलण्याची धमकी दिली जात आहे. विशेष म्हणजे या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ​याबाबत तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, संबंधित ड्रायव्हरने एका हॉटेलमध्ये घुसून तेथील कारागिरांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ड्रायव्हरच्या या गुंडगिरीमुळे समस्त हॉटेल व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. ​या प्रकाराला कंटाळून शहरातील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येत नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

     सदर ड्रायव्हर वेळेवर कचरा संकलनासाठी येत नाही?

​विचारणा केल्यास अत्यंत उरमटपणे बोलतो, आवाज चढवतो आणि मारायची भाषा करतो. ​मनात येईल तेवढ्या पैशांची मागणी करतो व न दिल्यास अरेरावीची भाषा करतो. ​माझी कुठेही तक्रार करा, मी तसाही गाडीवरच्या संघटनेचा अध्यक्ष आहे, माझं कोणीही काही वाकडं करू शकत नाही. तक्रार केल्यास काम बंद करेल, अशी धमकी देखील देतो.
​हॉटेल राजबक्षी, हॉटेल अवजिनाथ, नवरत्न हॉटेल, दोस्ती हॉटेल, ग्रेप्स गार्डन, स्वामी समर्थसह अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या सदर तक्रार अर्जावर सह्या केलेल्या आहेत.
तर ​अश्या गुंड प्रवृत्तीच्या ड्रायव्हरची त्वरित कामावरून हकालपट्टी करावी, अन्यथा सर्व हॉटेल व्यावसायिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा देखील दिलेला आहे.
तसेच, हॉटेल व्यावसायिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यालयातही अर्ज देऊन पाठिंबा मागितला आहे, कारवाई न झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. आरोग्य अधिकारी पठाण साहेब यांनी ड्रायव्हरला पाठीशी न घालता त्वरित कारवाई करावी,अशी मागणीही करण्यात आली आहे.शहरात अनेक ठिकाणी दिवसाढवळ्या कचऱ्याचे ढीग पडलेले असून, ठेकेदाराकडून पालिका नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या कचरा संकलनाचा ठेका कायमचा रद्द करण्याची मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन, गुंड प्रवृत्तीच्या ड्रायव्हरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांन मधून होत आहे.

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget