नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्याची कुस्तीत बाजी, विभागीय स्तरावर निवड
धोबी पछाड" डावाने चितपट करत त्याने जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. १७ वर्षाखालील वयोगटातील १०० किलो वजनी गटात आपले कौशल्य आणि दमदार खेळाचे प्रदर्शन;
संगमनेर प्रति: दि 12 सप्टेंबर 2025 संगमनेर शहराची ओळख बनलेल्या नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलने पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित आंतरशालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये शाळेचा विद्यार्थी कुमार फरिद समीर शेख याने लक्षवेधी कामगिरी केली आहे.
फरिदने १७ वर्षाखालील वयोगटातील १०० किलो वजनी गटात आपले कौशल्य आणि दमदार खेळाचे प्रदर्शन करत कुस्तीचे मैदान गाजवले. प्रतिस्पर्ध्याला "धोबी पछाड" डावाने चितपट करत त्याने जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. त्याच्या या अप्रतिम कामगिरीमुळे त्याची पुढील विभागीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शाळेच्या यशाचे सूत्र:
शिक्षण आणि खेळाचा योग्य समतोल गेल्या अनेक वर्षांपासून नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल केवळ दर्जेदार शिक्षण आणि १००% निकालासाठीच नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ओळखली जाते. शाळेचे विद्यार्थी शैक्षणिक आणि क्रीडा अशा दोन्ही क्षेत्रांत आपली छाप सोडत आहेत. फरिदचे हे यश याच धोरणाचे प्रतीक आहे. शाळेच्या इन्चार्ज, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याला पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. फरिदच्या या यशाचे संगमनेर तालुक्यासह संपूर्ण अहिल्या नगर जिल्ह्यातून कौतुक होत आहे. त्याचे परिश्रम आणि त्याला मिळालेले शाळेचे प्रोत्साहन हे इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
Post a Comment