अहिल्यानगर' घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कडून तीव्र निषेध;
प्रशासनाकडे कठोर भूमिका घेण्यासाठी काय केली मागणी?जातीय तणाव आणि दंगलीतून केवळ घरांचे, दुकानांचे नुकसान होत नाही, तर? वाचा सविस्तर;
अहिल्यानगर (पुणे ) : दि 1 ऑक्टोबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर मध्ये नुकत्याच घडलेल्या तणावपूर्ण घटनेमुळे संपूर्ण सामाजिक वातावरण हादरले आहे. शेकडो वर्षांची सर्व धर्म समभावाची परंपरा जपणाऱ्या या शहरात भीतीचे सावट पसरले आहे. ही घटना केवळ एका समाजाची नव्हे, तर आपल्या संपूर्ण मानवतेची जखम आहे, असे मत व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), मुस्लिम आघाडीने या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला आहे. यासंदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने आज आजरोजी मा. ज्योती कदम, उपजिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनाकडे कठोर भूमिका घेण्याची मागणी केली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गटाकडून) प्रमुख मागण्या
1) समाजात तेढ व वैमनस्य निर्माण करणाऱ्या खऱ्या दोषींना तातडीने शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. 2) निष्पाप व निरपराध नागरिकांवर अन्याय होऊ नये. 3) ज्यांचा रस्ता रोको आंदोलनामध्ये कोणताही सहभाग नाही, अशा लोकांवर कारवाई न करता पोलिसांनी अधिक दक्षतेने व पारदर्शकतेने काम करावे. 4) ज्या व्यक्तींनी रस्त्यावर रांगोळी काढून धार्मिक भावना दुखावल्या आणि धार्मिक तणाव निर्माण केला, अशा 'बांडगुळांना' कठोर शिक्षा व्हावी.5) अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरिता प्रशासनाने सर्व समाजघटकांना एकत्र आणून शांती समित्या व संवादाचे व्यासपीठ त्वरित निर्माण करावे. 6) शाळा, महाविद्यालये आणि गावपातळीवर बंधुता, ऐक्य आणि शांततेचा संदेश देणारे उपक्रम नियमित राबवावेत.निवेदनात, जातीय तणाव आणि दंगलीतून केवळ घरांचे, दुकानांचे नुकसान होत नाही, तर माणुसकीचा पाया खचतो, अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे. समाजात दहशत, अविश्वास आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असताना प्रशासनाने ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे.
उपजिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने योग्य कारवाई करावी, जेणेकरून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होईल आणि अहिल्यानगरला पुन्हा एकदा शांतता, ऐक्य आणि सुरक्षिततेचा आश्वासक श्वास मिळेल. शहरात गुण्यागोविंदाने सर्व समाज नांदावेत, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केले आहे. सदर निवेदन देता वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मुस्लिम आघाडी पुणे शहर अध्यक्ष हाशिम शेख, तसेच नदीम मेमन, फिरोज शेख, अमित गायकवाड, सलाउद्दीन शेख, जावेद मेमन, सोनाली घुलावडे, सोनाली धोत्रे, सोनाली जोगडे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment