December 2025

पद नसतानाही जनसेवा गुड्डू इंजिनिअर यांच्या पाठपुराव्यामुळे लखमिपुरा येथील 'गटार चोकअप'चा प्रश्न मार्गी,



​संगमनेर प्रति : दि.27 डिसेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, लखमिपुरा प्रभाग क्रमांक ११ मध्ये आज (२७ डिसेंबर २०२५) गटारे चोकअप झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत होते. मात्र, सामाजिक कार्यकर्ते मुजम्मिल उर्फ गुड्डू इंजिनिअर यांनी या तक्रारीची दखल घेत तातडीने पावले उचलली आणि अवघ्या काही तासांतच हा प्रश्न निकाली काढला.नागरीकांची तक्रार मिळताच गुड्डू इंजिनिअर यांनी संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. प्रशासकीय स्तरावर सतत पाठपुरावा केल्यामुळे काही तासांतच कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि काम पूर्ण केले. कोणतेही राजकीय पद नसतानाही वॉर्डातील रस्ते, नाले आणि आरोग्यविषयक प्रश्नांवर त्यांचा सक्रिय सहभाग वाखणण्याजोगा आहे.समाजहिताची कामे करण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नसते, तर प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते. नगरपालिकेतील कामे असोत, हॉस्पिटल किंवा पोलीस स्टेशनशी संबंधित काम असो, मी सदैव नागरिकांच्या मदतीसाठी खांद्याला खांदा लावून उभा आहे. असे आवाहन मुजम्मिल शेख उर्फ (गुड्डू) इंजिनिअर यांनी केले आहे. सध्या लखमिपुरा भागात गुड्डू इंजिनिअर यांच्या या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. रस्ते, नाले आणि सामाजिक हिताच्या कामात त्यांचा असलेला पुढाकार हा इतर कार्यकर्त्यांसाठी आदर्श ठरत आहे.

नगराध्यक्षांनाही मिळवून दिले मोठे मताधिक्य; शेख गणी हाजी आणि इम्रान शेख यांची रणनीती ठरली यशस्वी.


संगमनेर प्रति : दि.25 डिसेंबर2025 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, संगमनेर नगरपालिकेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वात जास्त चुरशीच्या ठरलेल्या प्रभाग क्रमांक १० चा निकाल अखेर ऐतिहासिक लागला आहे. कोणत्याही राजकीय वारसा नसलेल्या एका सर्वसाधारण महिलेला नगरसेवक पदावर विराजमान करून, नगरसेवक नूरमोहम्मद पीरमोहम्मद शेख यांनी पुन्हा एकदा आपली 'टीम लीडर ' ही ओळख अधोरेखित केली आहे. भल्याभल्यांचे तर्क-वितर्क फोल ठरवत या प्रभागाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे.निवडणुकीच्या काळात प्रभाग १० मध्ये अनेक चर्चांना उधाण आले होते. विरोधक आणि काही राजकीय पंडित नूरमोहम्मद शेख यांच्यासोबत असलेल्या महिला उमेदवाराच्या पराभवाच्या शर्यती लावत होते. मात्र, मतदानाचा दिवस आणि त्यानंतर आलेल्या निकालाने सर्वांचे अंदाज धुळीस मिळवले. शकिला इलियास बेग यांच्या रूपाने एका सामान्य चेहऱ्याला सोबत घेऊन, कोणत्याही दगाफटक्याशिवाय नूरमोहम्मद शेख यांनी ही निवडणूक पूर्ण ताकतीने लढवली आणि जिंकूनही दाखवली.या निकालात नूरमोहम्मद शेख यांना २०१६ मते मिळाली, तर त्यांच्या सहकारी शकिला बेग यांनी १३३१ मते घेत अनपेक्षित विजय संपादन केला. विशेष म्हणजे, केवळ स्वतःचा विजय न पाहता, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. मैथिली तांबे यांना या प्रभागातून तब्बल २८७० मतांचे मोठे मताधिक्य मिळवून देण्यात शेख गणी हाजी, माजी उपनगराध्यक्ष इम्रान गणी शेख आणि नूरमोहम्मद शेख यांची टीम यशस्वी ठरली. या विजयामागे गेल्या ९ वर्षांपासून नगरसेवक म्हणून नूरमोहम्मद शेख यांनी केलेली जनसेवा आणि नेत्यांचे पाठबळ कारणीभूत ठरले असल्याचे दिसून आले आहे.त्यातच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे खंबीर नेतृत्व आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा दांडगा जनसंपर्क.आमदार सत्यजित तांबे यांचे '२.० व्हिजन' आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या मागील कामांची पावती.आणि किंग मेकरच्या भुमिकेत ​शेख गणी हाजी आणि इम्रान गणी शेख यांची सूक्ष्म नियोजनातील खंबीर साथी मुळेच.विशेष :  मागील पंचवार्षिक मध्ये एका सर्वसाधारण महिलेच्या नंतर पुन्हा शकिला बेग यांच्या वचनपूर्तीचा इतिहास रचला गेला मागील निवडणुकीत मतदारांनी मागिल काळातही एका सर्वसामान्य महिलेला नगरसेविका बनवून सर्वांना चकित केले होते. तोच इतिहास त्यांनी २०२५ मध्ये शकिला बेग यांच्या विजयाने पुन्हा गिरवला आहे. राजकारण किंवा समाजकारणाशी थेट संबंध नसलेल्या महिलेला सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणून नुरमहंमद शेख आणि हाजी परिवाराने आपल्या शब्दाची पक्की ओळख करून दिली आहे.

------------------- ​[ चौकट ] -----------------------------
लोकांनी माझ्या कामावर आणि थोरात-तांबे परिवाराच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. प्रभाग १० मधील जनतेने दिलेला हा कौल केवळ माझा नसून, सामान्य कार्यकर्त्याच्या जिद्दीचा विजय आहे. आम्ही दिलेला शब्द पाळला याचा सार्थ अभिमान आहे.

--नूरमोहम्मद पीरमोहम्मद शेख (नगरसेवक, संगमनेर)---


✍️कार्यकारी संपादक शौकत पठाण

पतसंस्था घोटाळ्याच्या अफवा असो कि सत्य आता चेअरमनच्या खुलाश्यावर विश्वास कोण ठेवणार? त्यातच कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक;




​कोपरगाव प्रती: दि.१६ डिसेंबर २०२५ रोजी मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगावचे राजकीय-सामाजिक कार्यकर्ते काका कोयटे यांच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेवर कर्जदारांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहार आणि घोटाळ्याच्या गंभीर आरोपांमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या आरोपांचा थेट परिणाम श्रीरामपूर शाखेवर दिसला असून, ठेवीदारांनी आपल्या कष्टाच्या पैशांच्या सुरक्षिततेच्या चिंतेतून एकाच दिवसात लाखोंच्या ठेवी काढून घेण्यासाठी मोठी गर्दी केली. त्यामुळे संस्थेच्या आर्थिक स्थितीबद्दल देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे: एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात ठेवी काढल्याने पतसंस्थेच्या भविष्यातील आर्थिक स्थैर्याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे चेअरमनचा दावा हा विरुद्ध वास्तव तर नाही ना.कारण पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादापा तथा काका कोयटे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या ४ दिवसांत पतसंस्थेच्या ठेवींमध्ये तब्बल रू.३ कोटी ८० लाख रुपयांची वाढ झाली आहे, जो ठेवीदारांचा संस्थेवरील दृढ विश्वास दाखवतो.मात्र, एका बाजूला लाखोंच्या ठेवी एकाच दिवसात काढल्या जात असताना, दुसऱ्या बाजूला रू ३.८० कोटींची वाढ झाल्याचा चेअरमनचा दावा संभ्रम निर्माण करणारा आहे. ठेवीदारांची भीती आणि श्रीरामपूर शाखेतील गर्दी हे वास्तव समोर असताना, पतसंस्थेच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या खुलाशांवर आता किती लोक विश्वास ठेवतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. आणि त्यातच कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक आणि निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार हे कोपरगाव चे राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्ते काका कोयटे यांच्या नेतृत्वातले आहे अस असताना विरोधकांना आयतेच भांडवल मिळाल्याची देखील जोरदार चर्चा कोपरगाव शहरात सुरू आहे.तर हिच चर्चा निवडणुकीच्या राजकीय क्षेत्रात मोठी कायापालट करेल अशी चर्चा नागरिकांमध्ये एकंदरीत सुरू आहे... त्यामुळे आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार फैरी मध्ये समता पतसंस्थेवर कोणता नेता किती बोलणार आणि बोलणार तर किती घोटाळे उघड होणार किंवा ह्या घोटाळ्यांना टाळेलागणार कि बँकेलाच टाळे लागणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे,

संगमनेर आगारात शिवनेरी थांबणार; प्रवाशांची गैरसोय दूर – आमदार खताळ



संगमनेर प्रति: दि 11 डिसेंबर 2025 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार ,आगारात शिवनेरी आणि विनावाहक बसथांब्याबाबत राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाला निर्देश देत असल्याचे सांगितले आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नामुळे अनेक वर्षापासून पुणे नाशिक येथून येणाऱ्या प्रवाशांची होणारी पायपीट थांबणार आहे. संगमनेरमधील अनेक प्रवासी नोकरी शिक्षण आणि वैद्यकीय कामासाठी पुणे नाशिक या मोठ्या शहरात जात येत असतात मात्र शिवनेरी व विना वाहक बसगाड्या संगमनेर शहरात न येता बाह्यवळण मार्गाने जात असल्या मुळे संगमनेरला येणाऱ्या प्रवाशांना शहराच्या बाहेरच उतरावे लागत होते.या गंभीर समस्येबाबत आ. अमोल खताळ यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना लेखी निवेदन देऊन या प्रमुख मागणीकडे परिवहन मंत्री सरनाईक यांचे लक्ष वेधले परिवहन मंत्र्यांनी आमदार खताळ यांच्या मागणीची गंभीर दखल घेत तसेच प्रवासी वर्गाचे होणारे हाल लक्षात घेऊन  शिवनेरी आणि विना वाहक बसला संगमनेर आगारात थांबा देण्याबाबतच्या सुचना संबंधित विभागाला  दिल्या आहेत या निर्णया मुळे प्रवाशांची  होणारी गैरसोय दूर होऊन पुणे-नाशिक मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या तातडीच्या निर्णया बद्दल आ खताळ यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले आहे.


आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश राज्यातील जवळपास ०३ कोटी नागरिकांना होणार फायदा ;


संगमनेर प्रति : दि 11 डिसेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यातील तुकडेबंदी कायदा करण्याबाबतच्या विधेयकास नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील तीन कोटी  लोकांच्या जमिनीचे प्रश्न मार्गी लागणार आहे
मुंबई येथील विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात संगमनेरसह राज्यातील तुकडेबंदी करण्याबाबत जनतेच्या मागणी संदर्भात आ .अमोल खताळ यांनी लक्षवेधी द्वारे प्रश्न मांडून या प्रमुख मागणीकडे  राज्यशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याच्याबाबत विधेयक मांडण्यात आले होते. त्या विधेयकाला विधिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता संगमनेरसह राज्यातील करोडो लोकांचे जमिनीचे प्रश्न मार्गी लागणार आहेत
संगमनेर तालुक्यातील तसेच संपूर्ण राज्यातील कोट्यवधी शेतकरी आणि जमीन धारक अनेक वर्षे अडचणीत होते. जमीन विभागणी, नोंदणी, कर्ज प्रक्रिया, हक्क नोंदी होत नव्हत्या याबाबत आपण  विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात  प्रश्न मांडला होता. त्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तुकडेबंदी विधेयक मांडण्यात आले आणि त्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली त्यामुळे आता कोट्यावधी लोकांच्या जमिनीचे वाद, तुकडेबंदीतील अडचणी नोंदणी प्रक्रिया यातील गुंतागुंत दूर होईल. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील असे मत संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले आहे,



आ. खताळ; महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन 


संगमनेर प्रति:दि.06 डिसेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळे शोषित, वंचित आणि दुर्लक्षित समाजघटकांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना प्रगतीची संधी मिळाली. या महामानवाने घालून दिलेल्या मूल्यांची जपवणूक करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार खताळ यांच्या हस्ते शहरातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, शिवसेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, रवींद्र म्हस्के, सचिन साळवे, श्रीकांत मुर्तडक, विकास जाधव, साक्षी सूर्यवंशी, संगीता पुंड आदींसह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार खताळ म्हणाले, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेमुळे माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला तालुक्याचा आमदार होण्याची संधी मिळाली. संविधानाने प्रत्येक नागरिकाला शिक्षण, नोकरी, विचार मांडण्याचा आणि मतदानाचा अधिकार दिला. या हक्कांमुळे समाजातील शोषित, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग मोकळा झाला.
.............................................................................
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर सामाजिक न्याय, समानता आणि बंधुत्वाची वाट धरली. प्रत्येक समाजघटकाला उभे करण्यासाठी त्यांनी अविरत संघर्ष केला. त्यांच्या आदर्श विचारांची आणि समानतेच्या शिकवणीची पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हीच त्यांना दिलेली खरी आदरांजली ठरेल. - अमोल खताळ( आमदार)
.............................................................................

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget