डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूल्यांची जपवणूक करा

आ. खताळ; महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन 


संगमनेर प्रति:दि.06 डिसेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळे शोषित, वंचित आणि दुर्लक्षित समाजघटकांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना प्रगतीची संधी मिळाली. या महामानवाने घालून दिलेल्या मूल्यांची जपवणूक करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार खताळ यांच्या हस्ते शहरातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, शिवसेना शहरप्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, रवींद्र म्हस्के, सचिन साळवे, श्रीकांत मुर्तडक, विकास जाधव, साक्षी सूर्यवंशी, संगीता पुंड आदींसह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार खताळ म्हणाले, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेमुळे माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला तालुक्याचा आमदार होण्याची संधी मिळाली. संविधानाने प्रत्येक नागरिकाला शिक्षण, नोकरी, विचार मांडण्याचा आणि मतदानाचा अधिकार दिला. या हक्कांमुळे समाजातील शोषित, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग मोकळा झाला.
.............................................................................
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर सामाजिक न्याय, समानता आणि बंधुत्वाची वाट धरली. प्रत्येक समाजघटकाला उभे करण्यासाठी त्यांनी अविरत संघर्ष केला. त्यांच्या आदर्श विचारांची आणि समानतेच्या शिकवणीची पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हीच त्यांना दिलेली खरी आदरांजली ठरेल. - अमोल खताळ( आमदार)
.............................................................................

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget