छात्रभरतीच्या प्रदेशाध्यक्षपदी संगमनेरचे अनिकेत घुले यांची निवड
छात्र भारती ही गरिबांच्या शिक्षणासाठी गेली 42 वर्ष महाराष्ट्रभर काम करत आलेली आहे ;
संगमनेर प्रति: दि 25 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी साथी अनिकेत घुले यांची मुंबई येथील बेचाळीसाव्या अधिवेशनात निवड करण्यात आली आहे. 42 वे राज्य अधिवेशन मुंबईत काळा चौकी या ठिकाणी 24 आणि 25 जानेवारी 2026 रोजी पार पडले आहे. या अधिवेशनामध्ये सर्वांनुमते अनिकेत घुले यांची एकमताने निवड झाली. यावेळी छात्रभारतीचे मावळते अध्यक्ष रोहित ढाले, राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजा कांदळकर हे उपस्थित होते.अनिकेत घुले यांची ओळख गेली दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांचा आवाज अशी आहे. शिक्षणाच्या प्रश्नावर ते काम करत आलेले आहे. अनेक आंदोलनांमध्ये विद्यार्थ्यांना फी चे पैसे परत मिळवून देणे, संस्थाचालकांच्या विरोधात थेट जाऊन भूमिका घेणे. कॉलेज प्रशासन सरकारच्या विरोधात कायम ते रस्त्यावरती आंदोलन करत आलेले आहे. संगमनेर मध्ये जवळपास विद्यार्थ्यांना 2024- 25 साली एक कोटी रुपये पेक्षा जास्त रक्कम त्यांनी परत मिळूवून दिली. मराठी शाळा वाचवण्यामध्ये अनिकेत घुले यांनी महाराष्ट्र मध्ये फिरून मराठी शाळा वाचवा असे अभिमान राबवले होते. मोठे मोर्चेही काढले होते. कॉलेजमध्ये जाऊन वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेमध्ये संविधान समजून सांगणे ही अनिकेत यांची ओळख आहे.छात्र भारती ही गरिबांच्या शिक्षणासाठी गेली 42 वर्ष महाराष्ट्रभर काम करत आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या कॉलरशिप खाजगीकरण, मराठी शाळा, भ्रष्टाचार अश्या मुद्यावर लढत आलेली आहे.डॉ नरेंद्र दाभोळकर, डॉक्टर मु.ब. शहा, कपिल पाटील, डॉ. ना. य.डोळे सर, यदुनाथ थत्ते यासह अनेक मोठ्या लोकांचा छात्र भारतीला वारसा आहे. अनिकेत घुले यांचे महाराष्ट्रभरामधून सगळीकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.
Post a Comment