महायुती सरकारने आद्य क्रांतिकारकांच्या इतिहासाला उजाळा दिला-आ खताळ
त्यांना आता महा पुरुष आठवायला लागले आमदार खताळ यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला टोला,राजे उमाजी नाईक यांची जयंती आमदार खताळ यांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात;
संगमनेर प्रति: देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर व क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले. मात्र त्या क्रांति कारकांचा इतिहास झाकण्याचा काँग्रेस सरकारने प्रयत्न केला हे फार मोठे दुर्दैव आहे. मात्र त्याला खऱ्या अर्थाने उजाळा देण्याचे काम महायुती सरकारच्या माध्य मातून झाले असल्याचे परखड मत आ अमोल खताळ यांनी मांडले जय मल्हार क्रांती या संघटनेच्यावतीने आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आमदार अमोल खताळ जनसंपर्क कार्यालयापासून ढोल ताशाच्या गजरामध्ये बसस्थानकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर बस स्थानकावर आयोजित जयंती महोत्सव कार्यक्रमात समाज बांधवांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते या वेळी व्यासपीठावर श्रीरामपूरचे प्रखर हिंदुत्ववादी नेते सागर बेग जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष रोहिदास मदने नाशिक जिल्हाध्यक्ष मतेश जेडगुले शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे शहरप्रमुख दिनेश फटांगरे विनोदसूर्यवंशी भाजपतालुका अध्यक्ष गुलाब भोसले शहराध्यक्ष पायल ताजणे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे भारत गवळी दिलीप रावळ अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष कैलास जेडगुले जिल्हा सचिव भारत गोफणे दत्तू गोफने तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण युवक अध्यक्ष सागर जेडगुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते,आ खताळ म्हणाले की आद्य क्रांति कारक राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध लढा दिला त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे.राजे उमाजी नाईकांनीफक्त रामोशी समाजबांधवांना न्याय दिला नाही तर सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्नकेला आहे. त्यामुळे रामोशी समाजबांधवांनी आद्य क्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांचा आदर्श घेऊन पुढं मार्गक्रमण करावे ज्या पद्धतीने रामोशी समाज बांधवांनी एकत्रित येत गनिमी काव्याने ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष ळरत त्यांना सळो की पळो करून सोडले .तसाच गनिमी कावा या समाजबांधवांनी विधानसभा निवडणुकी मध्ये वापरत आम्ही कोणाच्या दबावाला व दहशतीला घाबरणारे नाही हे दाखवून देत हा सर्व समाज महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला. गेली कित्येक वर्ष केंद्रात व राज्यात विशेषता संगमनेर मध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर होते. त्या वेळी फक्त ठराविक महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे संगमनेर मध्ये साजरे होत होते.मात्र या तालुक्यात परिवर्तन झाल्या नंतर सर्वच राष्ट्रमहापुरुषांचे जयंती उत्सव साजरे करण्याचे भाग्य मला मिळालेआहे प्रत्येक समाजघटकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम आपण करत आहोत. तुम्ही माझ्यावरती जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ दिला जाणार नाही असाही विश्वास आमदार खताळ व्यक्त केला .जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रोहिदास मदने शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत जय मल्हार क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले तर आभार मच्छिंद्र गुळवे यांनी मानले हा जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते महिला पुरुष तरुण यांनी विशेष परिश्रम घेतले
रामोशी समाजाचा येथून मागे काहींनी फक्त मतासाठीच वापर केला गेला. मात्र तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन माझ्या पाठी मागे भक्कम उभे राहत परिवर्तन केले आहे त्यामुळे त्यांना आता महापुरुष आठवायला लागल त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणून ते आता-५ ऑक्टोबरला राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करणार आहे असे समजले आहे याचा आम्हाला आनंद आहे.आम्ही सर्वच राष्ट्र महापुरुषां च्या जयंती उत्सव साजरे करू लागलो. त्यामुळेच खऱ्या अर्थाने त्यांना आता महा पुरुष आठवायला लागले असल्याचाटोला आमदार खताळ यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला आहे,
Post a Comment