महाराष्ट्रातील नावाजलेले व्यक्तिमत्व सौ, शहरी तो एक संगमनेरीच्या ग्रुप ॲडमिनला ऐतिहासिक सन्मान;
संगमनेर प्रति: दि 28 सप्टेंबर2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील आपल्या निर्भीड भूमिकेसाठी ओळखले जाणारे तसेच सौ शहरी तो एक संगमनेरी या लोकप्रिय व्हॉट्सॲप ग्रुपचे ॲडमिन असलेले संजय क्षत्रिय उर्फ बंडूशेठ यांची 2026 साठीच्या संगमनेर येथील अत्यंत मानाच्या हजरत सय्यद शहा बाबा उर्स कमिटीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. मोगलपुरा ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे संगमनेरच्या ऐतिहासिक हिंदू-मुस्लिम ऐक्याला आणखी बळकटी मिळाली असून, सर्व स्तरांतून या निवडीचे उत्साहाने स्वागत होत आहे.
बंडूशेठ यांचा व्हॉट्सॲप ग्रुप नव्हे तर हक्काचं व्यासपीठच आहे संजय क्षत्रिय हे केवळ संगमनेर तालुक्यातच नव्हे, तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि सामाजिक कार्यामुळे परिचित आहेत. त्यांनी सुरू केलेला सौ शहरी तो एक संगमनेरी हा व्हॉट्सॲप ग्रुप आज संगमनेर शहरातील आणि तालुक्यातील सर्व समाज बांधवांसाठी हक्काचं व्यासपीठ बनलं आहे. वेगवेगळ्या धार्मिक विचारधारेचे लोक, विविध शासकीय प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी, तसेच विविध पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, नेते आणि कार्यकर्ते यांना एकाच व्यासपीठावर आणून आपले विचार मांडण्याची सुविधा उपलब्ध करून देतात. बहुतांश शहरातील व तालुक्यातील विविध समस्या याच ग्रुपच्या माध्यमातून प्रशासनासमोर मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न बंडूशेठ नेहमी करत आले आहेत. त्यांचा हा समन्वयवादी आणि सर्वसमावेशक स्वभावच त्यांच्या निवडीमागे महत्त्वाचा ठरला आहे. सय्यद बाबांचा उरूस हा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जागतिक प्रतीक आहे.
संगमनेर शहराच्या मध्यभागी असलेले हजरत सय्यद शहा बाबा दर्गा हे केवळ (देवस्थान )नसून ते हिंदू-मुस्लीम ऐक्याचे महत्त्वपूर्ण आणि जागृत प्रतीक म्हणून ओळखले जाते. या दर्ग्याचा उरूस (जत्रा ) हा संगमनेरच्या ऐतिहासिक नगरीतील एक मोठा आणि महत्त्वाचा सोहळा मानला जातो, ज्यासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाविक भक्तांची अलोट गर्दी उसळते. सन 2026 च्या उर्स कमिटीवर मोगलपुरा ट्रस्टने अध्यक्ष व सदस्यांची निवड करताना सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य कायमस्वरूपी टिकून राहावे या उदात्त हेतूने संजय क्षत्रिय उर्फ बंडूशेठ यांची निवड केली. या निवडीमुळे दर्गा कमिटीमध्ये आता समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व झाले आहे. सय्यद बाबा ऊस कमिटी 2026 करिता अध्यक्ष शेख गफ्फार अब्दुल लतीफ यांची तर कमेटी सदस्य पदी बंडूशेठ क्षत्रिय यांच्या या ऐतिहासिक निवडीमुळे संगमनेर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले बघण्यास मिळाले आहे. त्यांचे चाहते आणि हितचिंतक सोशल मीडियासह (फेसबुक, व्हॉट्सॲप) तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ही निवड केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, सामाजिक सलोखा आणि धर्मनिरपेक्ष विचारांचा गौरव असल्याचे मानले जात आहे. एवढं मात्र नक्की,
✍️:कार्यकारी संपादक,एस.पठाण
Post a Comment