शिवसेना(ठाकरे) शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची निर्धार बैठक व सत्कार सोहळा शिर्डी येथे संपन्न*
ठाकरेंची शिवसेना बऱ्याच मोठ्या अवधीनंतर पुन्हा एकदा सक्रिय अवस्थेत.शिर्डी लोकसभेतील अकोले,संगमनेर,कोपरगाव,श्रीरामपूर अशा महत्त्वाच्या तालुक्यात झाल्या नियुकत्या ;
शिर्डी प्रति : दि 8 फेब्रुवारी2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिर्डी लोकसभेतील कार्यकारिणीत बदल करण्यात आल्या नंतर येथील ठाकरेंची शिवसेना बऱ्याच मोठ्या अवधीनंतर पुन्हा एकदा सक्रिय अवस्थेत जिल्हाप्रमुख सचिन कोते पाटील, जगदीश चौधरी यांच्या नेतृत्वात येत आहे. शिर्डी लोकसभेतील अकोले,संगमनेर,कोपरगाव,श्रीरामपूर अश्या महत्वाच्या तालुक्यात गेल्या दहा ते वीस पंचवीस वर्षापासून शिवसेना पक्ष संघटन वाढीसाठी योगदान देणाऱ्या ठाकरेनिष्ठ शिवसैनिकांना शहरप्रमुख, तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांसह कार्यकारिणीत महत्त्वाच्या पदावर जबाबदारी देऊन पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना नेते संजयजी राऊतखासदार अनिलजी देसाई यांनी अनोखा प्रयोग केल्याने शिवसैनिकांत नवसंचार आल्याने आगामी पंचायत समिती - जिल्हा परिषद निवडणूक मोठ्या ताकदीनीशी लढायचा निर्धार शिवसैनिकांनी केला असून गट तट विसरून सर्व शिवसैनिकांची वज्रमूठ आता संपूर्ण सहा तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्ये निवडणूक नियोजन करण्यास सज्ज असल्याचे मार्गदर्शन करताना सचिनभाऊ कोते पाटील यांनी सांगितले. यावेळी संगमनेर कोपरगाव येथील उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख शहर प्रमुख संघटक समन्वयक उपतालुकाप्रमुख उपशहर प्रमुख सह नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन त्यांना सन्मानित देखील करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्रीरामपूर येथील ज्येष्ठ शिवसैनिक अशोक थोरे मामा यांनी भूषवले तर जिल्हा समन्वयक मुकुंद सिनगर, बाळासाहेब जाधव, प्रमोद अण्णा लबडे, नाना बावके लखन भगत संगमनेर विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे, कोपरगाव विधानसभा संपर्कप्रमुख आशुतोष मार्कंडे, उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले तर कोपरगाव तालुकाप्रमुख भरत मोरे यांनी प्रास्ताविक केले. नवनिर्वाचित पदाधिकारी उपजिल्हा संघटक रंगनाथ फटांगरे, उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, संगमनेर तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे पश्चिम, तालुकाप्रमुख भीमाशंकर पावसे पूर्व, विधानसभा प्रमुख योगेश खेमनर, शहरप्रमुख अमित चव्हाण, शहरप्रमुख फैसल सय्यद, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इम्तियाज शेख, विधानसभा संघटक दिपक साळुंके, शहर संघटक आसिफ तांबोळी, वाहतूक सेना (रिक्षा सेना) तालुकाप्रमुख अशोक बडे, वाहतूकसेना शहरप्रमुख माघाडे, तालुकाप्रमुख अश्वि मंडल प्रकाशराजे गायकवाड, बोटा मंडलप्रमुख अमित फटांगरे, युवासेना (पठारभाग) तालुकाप्रमुख लखन सोन्नर, युवा तालुका प्रमुख अक्षय गुंजाळ युवासेना विधानसभाप्रमुख अमोल डुकरे, तालुकासंघटक मच्छिंद्र दिघे, उपतालुकाप्रमुख सचिन दिघे, उपतालुकाप्रमुख राजाभाऊ सातपुते, उपतालुकाप्रमुख बाळासाहेब हासे, उपतालुकाप्रमुख रवी गिरी, उपतालुकाप्रमुख भाऊसाहेब वराळे, उपतालुकाप्रमुख त्र्यंबक शिंदे, उपतालुकाप्रमुख अरुण भालेराव, उपतालुकाप्रमुख एकनाथ खेमनर, उपतालुका प्रमुख संजय सोनवणे कैलास नवले गोकुळ लांडगे व्यापारी आघाडी शहरप्रमुख संभवशेठ लोढा, उपशहरप्रमुख रहिम बेग, परवेझ शेख, मुकेश काठे, प्रविण चव्हाण, दीपक वन्नम, जितेंद्र दर्वे, अनिल खुळे, तसेच महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख आशाताई केदारी, संगीता ताई गायकवाड, वैशालीताई वडतले ह्या सर्वांचा सत्कार व सन्मान जिल्हाप्रमुख सचिनभाऊ कोते पाटील व विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे तसेच राहता तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.
Post a Comment