nmpnews.in

Latest Post

आमदार खताळांवरील खोट्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय वातावरण तापले;


संगमनेर प्रति दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांची सोशल मीडियावर बदनामी आणि आचार संहितेच्या काळात दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 352, 353(2) आणि 356(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत अक्षय दिलीप चिलाप रा. गुंजाळवाडी, संगमनेर यांनी स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे. त्या। नुसार 14 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता, तक्रारदार फेसबुक अॅप वापरत असताना “Sangamner Politics” या फेसबुक अकाउंटवरून त्यांच्या समोर एक पोस्ट आली. ही पोस्ट वादग्रस्त आणि धादांत खोटी असून कोणतेही कायदेशीर पुरावे उपलब्ध नसताना यामधून जाणीवपुर्वक आमदार अमोल खताळ यांची प्रतिमा मलिन करण्यात येत असल्याचे आढळून आले. 
दाखल तक्रारीनुसार सोशल मीडिया पोस्टमध्ये आमदार अमोल खताळ यांचा फोटो लावून आक्षेपार्ह मजकूर लिहिला गेला आहे. तसेच संगमनेर नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने पोस्ट पूर्णपणे चुकीची आणि राजकीय हेतूने प्रेरित असून, त्याचा मुख्य उद्देश आमदार खताळ यांना बदनाम करण्याचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

यापूर्वी संगमनेर विधानसभा निवडणुक 2024 मध्येही सोशल मिडीया अॅपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने निवडणुकीपूर्वी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले होते. तरीदेखील पुन्हा नगपरिषद निवडणुकीची आचारसंहिता असताना जाणीवपुर्वक दोन राजकीय गटांमध्ये व्देषाची भावना आणि वाद निर्माण होणार्‍या सोशल मीडिया पोस्ट केल्या जात आहेत. याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे.

नवीन कायद्यातील अधिकारांचा प्रभावी वापर; बंधपत्र तोडणाऱ्या श्रीरामपूर विभागातील १६ सराईत गुन्हेगारांची थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी;


श्रीरामपूर प्रति: दि 15 नोव्हेंबर रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार,आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर मोठी व कठोर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत कार्यकारी दंडाधिकारी म्हणून मिळालेल्या अधिकारांचा प्रभावी वापर करत, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी १६ सराईत गुन्हेगारांना थेट न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. चांगल्या वर्तणुकीसाठी बंधपत्र (Chapter Cases) न देणाऱ्या व बंधपत्राचे उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगारांवर राज्यातील ही अत्यंत मोठी आणि प्रभावी कारवाई मानली जात आहे.

​                        काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार (दि. २८/०६/२०२४) अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२६ ते १२९ खालील ‘चॅप्टर केसेस’ आणि बंधपत्रे (Bonds for Good Behaviour) न पाळणाऱ्यांवरील खटले त्यांच्यापुढे चालतात. मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे साहेब यांच्या आदेशानुसार, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या गुन्हेगारांवर ५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, त्यांचे प्रस्ताव BNSS कलम १२९ अन्वये कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक यांच्यापुढे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.                     

                            कारवाईची कारणे:

उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जयदत्त भवर (श्रीरामपूर), श्री. कुणाल सोनवणे (संगमनेर) आणि श्री. अमोल भारती (शिर्डी) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस स्टेशनकडून आलेले प्रस्ताव कार्यकारी दंडाधिकारी यांच्यापुढे सुनावणीसाठी ठेवण्यात आले. सुनावणी अंती, १६ गैरअर्जदार/प्रतिवादींना कोठडीत पाठवण्यात आले.

या १६ गुन्हेगारांना कोठडीत पाठवण्याची दोन प्रमुख कारणे:


​१.  काही गैरअर्जदार/प्रतिवादी यांनी चांगल्या वर्तणुकीसाठी बंधपत्र करून देण्यासाठी सक्षम जामीनदार हजर केले नाहीत.
२.  काही गुन्हेगारांनी यापूर्वी बंधपत्र दिल्यानंतरही, त्या कालावधीत पुन्हा गंभीर गुन्हे करून बंधपत्राचे उल्लंघन केले.
​       
पोलीस स्टेशननिहाय आकडेवारी:
​या १६ गुन्हेगारांना पुढीलप्रमाणे पोलीस स्टेशननिहाय न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे
:

अ.नं. पोलीस स्टेशन न्यायालयीन कोठडीत पाठवीलेल्या गैरअर्जदार / प्रतिवादी यांची संख्या

                    १ श्रीरामपूर शहर ५
                     २ संगमनेर शहर ३
                     ३ कोपरगाव शहर ३
                     ४ लोणी ३
                     ५ राहुरी २
                     एकुण   १६

कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नवीन कायद्याचा प्रभावी वापर💪

अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे यांनी कार्यकारी दंडाधिकारी म्हणून मिळालेल्या अधिकारांचा वापर करत, निवडणुकीच्या तोंडावर गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण केला आहे. नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता लागू झाल्यानंतर, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करण्यात आल्यावर रेकॉर्डवरील गुन्हेगारांना एकत्रितपणे न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याची, राज्यातील ही पहिली मोठी व अत्यंत प्रभावी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांमध्ये प्रचंड धसका निर्माण झाला आहे.


✍️: सा.न्यु मुळा प्रवरा संगमनेर

मनमानी दरांचा 'सिझन' संपणार,शिर्डीत शासकीय विश्रामगृहातील उपहारगृह चालकाची लुटमार थांबणार; भावफलक न लावता अवाचे सव्वा दर आकारणी बातमीचा परिणाम;


शिर्डी विशेष प्रतिनिधी (साप्ताहिक खरे सव्वाशेर): महाराष्ट्र शासनाच्या शासकीय विश्रामगृह परिसरात असलेल्या उपहारगृहांमध्ये शासन निर्णयानुसार दर्शनी भागात भाव फलक (Rate List) लावणे बंधनकारक असताना, शिर्डी येथील उपहारगृहधारक या नियमाचे सर्रास उल्लंघन करत होते. भावफलक न लावता मनमानी पद्धतीने अवाचे सव्वा दर आकारून भाविकांची लूटमार केली जात असल्याची माहिती हाती येताच, साप्ताहिक 'खरे सव्वाशेर' वर्तमानपत्राने वेळीच तात्काळ दखल घेऊन प्रसिद्धीच्या माध्यमातून योग्य तो आवाज उठवला. आता मात्र, या बातमीच्या परिणामामुळे भाविकांची ही लूटमार एका प्रकारे थांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.           नाशिकमध्ये दरफलक, मग शिर्डीत मनमानी का?

असाच प्रकार यापूर्वी नाशिक येथील शासकीय विश्रामगृह उपहारगृह (शिवनेरी, प्रतापगड) या ठिकाणी घडला होता. या ठिकाणी देखील सर्वसामान्य जनतेची आणि गेस्ट वर्गाची पिळवणूक व लूटमार केली जात होती. याबाबतही **साप्ताहिक 'खरे सव्वाशेर'**ने संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि दर फलक लावण्याबाबत पाठपुरावा केला. प्रसिद्धीच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर संबंधित खात्याचे अधिकारी खडबडून जागे झाले आणि त्यांनी तात्काळ उपहारगृहधारक यांना लेखी स्वरूपात दर फलक लावण्याबाबत नोटीस जारी करून त्याची अंमलबजावणी केली. नाशिक १५०, शिर्डी १७५? 'चिरीमिरी'चा गोरखधंदा? परंतु, शिर्डी शासकीय विश्रामगृह उपहारगृहात सध्या लावण्यात आलेल्या दरांमध्ये काही प्रमाणात तफावत आढळून येत आहे. नाशिक हे जिल्ह्याचे ठिकाण असूनही या ठिकाणी साधे जेवण केवळ १५० रुपये आहे, तर शिर्डी हे तालुक्याचे ठिकाण असतानाही येथे ते १७५ रुपये करण्यात आले आहे.
​या वाढीव दरामुळे "यामध्ये अधिकारी वर्गाचा चिरीमिरी घेण्याचा आतून गोरखधंदा तर नाही ना?" असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. नाशिकमध्ये अल्प दरात जेवणाची व्यवस्था असताना शिर्डीत मात्र वाढीव दर लावण्याचे नेमके कारण काय?

​      अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की मिलीभगत?

या शासकीय विश्रामगृहांची देखभाल करणारे अधिकारी, तसेच येथे कार्यरत असणारे अभियंता (Engineer) यांना हा प्रकार त्यांच्या उघड्या डोळ्यांनी कसा दिसत नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत. 'त्यांची उपहारगृहधारक यांच्यासोबत मी बघत तर नाही ना?' असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.
​याकरिता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक आणि विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांचे दार खटखटावे लागणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांचा खर्च; अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी!

साप्ताहिक 'खरे सव्वाशेर' या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती, तसेच आतापर्यंतच्या कालावधीत मुख्यमंत्री व इतर राज्यमंत्री यांचे झालेले दौरे यासाठी झालेला खर्च किती याबाबत माहिती घेण्यासाठी शासकीय दरबारी लेखी स्वरूपात पत्रव्यवहार करत आहे. त्यानंतर त्यात आढळणाऱ्या तफावतीस जबाबदार असणाऱ्या शाखा अभियंता (Section Engineer) यांच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, यासाठी साप्ताहिक 'खरे सव्वाशेर' वर्तमानपत्र प्रसिद्धीच्या माध्यमातून योग्य तो पाठपुरावा करत राहणार आहे.
सविस्तर माहिती जागेअभावी आमच्या पुढील अंकात वाचा.

ज्यांना कोणी ओळखत देखील नाही अशा काही हौशे, नवशे,भिकार - भंगारांना सोडा निष्ठावंतांना मारा शिक्का 


मंदिर,मस्जिद,गिरजाघर, गुरुद्वारें
और बुद्ध विहार अब सजने लगे है,
चंद दिनो मे इलेक्शन आ चुके
 ढोल, ताशे, नगारे बजने लगे है.... 
फरेबी और झुटे,मक्कारों की
फौज निकल पडी मैदानों मे,
हम ही तो है तुम्हारे रहनुमां
सभी के बोल गजने लगे है.....



सध्या महाराष्ट्र राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत, ज्यांना कोणी ओळखत देखील नाही अशा काही हौशे, नवशे, गवशांना मोठी भाऊगर्दी केली आहे, गल्ली - बोळातील शेंबडे, चोर - उचक्के, दारुडे, चर्सुंडे देखील पुढारी म्हणवत स्वतःला मिरवून घेत आहेत. त्यांना आपल्या स्वतःच्या घर, कुटुंब आणी नातेवाईक व मित्र मंडळ परिवाराची मते पडणार का ? याची शास्वती नाही, कारण ज्यांना कोणी ओळखतच नाही, ज्यांचे काही अस्तित्वच नाही, ती मंडळी आता भावी नगरसेवक, भावी जिल्हा परिषद सदस्य होण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत.परंतु प्रत्यक्षात यांचे कार्य काय आहे ? यांनी आजपर्यंतच्या कालावधीत कोणते सामाजिक कार्य केले ? याचा सर्वात आधी त्यांनी अभ्यास करायला नको काय? आणी मगच नगरपालिका किंवा जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याचा निर्णय घ्यायला हवा, परंतु आपलं कवडही सामाजाभिमुख कार्य योगदान नसताना केवळ उड्या मारून शेवटी काय साध्य करणार ?

       राजकारणाने गाठली खालची पातळी

सामाजाभिमुख कार्य करताना त्या कार्यातून मनुष्याची ओळख होते तथा पुढे त्याची सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण होते,आणी पुढे राजकारणात त्याचा फायदाही होतो,मात्र आयुष्यात असे कोणतेच सामाजिक कार्य केलेले नसताना त्यावर ज्यांना कवडीची देखील अक्कल नसताना पावसाळ्यातील भुईछत्र्या प्रमाणे यांचा अचानक उगम होवून आता ते मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास उत्सुक झाले आहेत, परंतु इतके दिवस विशेषता कोरोना संकटसमयी ज्याप्रसंगी प्रत्येकालाच मदतीची नितांत गरज होती त्यावेळी हे महाभाग कोणत्या बिळात लपून बसले होते,हल्ली राजकारणाने एक वेगळे वळण घेतले आहे,सध्या राजकारणाने खुपच खालची पातळी गाठवली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शहराच्या अनेक प्रभागामध्ये जनसामान्याच्या मुलभूत समस्यांच निवारण देखील झालेले नाही, त्यांचे प्रश्न व समस्या सोडवण्यात आलेल्या नाहीत, अशात ज्यांना कवडीची देखील अक्कल नाही ते आता प्रभागा मध्ये काय दिवे लावणार ? 
प्रत्येक वेळी निवडणुका आल्या की भोळ्या भाबड्या मतदार बंधू-भगिनींना खोट्या भूलथापा देऊन तसेच त्यांना खोटेच आश्वासने देऊन त्यांचा कायम फायदा घेण्यात आला परंतु यावेळेस मात्र मतदार बंधू भगिनी सावध आणी जागरुक झालेले आहेत, कोण आपले प्रश्न सोडवू शकतात, कोण भूल थापा देऊ शकतात हे सर्वांना कळून चुकलेले आहे. आता हल्लीचा जागरुक मतदार कुणाच्या भूलथापांना बळी पडणार नाही, यावेळी मतपेटीतून लबाड पुढाऱ्यांना त्यांची योग्य जागा दाखवून देणारच यात तीळ मात्र शंका नाही.


काही पुढारी स्वतःच्या (अनियतीतून कमावलेल्या) कमाईतून निवडणुका लढविणार की, बाप कमाईतून ? निवडणूका लढणार असा देखील जनतेस समोर प्रश्न उभा ठाकला असला तरी संधी साधू पुढाऱ्यांच्या भाऊगर्दी मुळे आज प्रत्येक गांव शहरातील "मंदिर, मस्जिद, गिरजाघर, गुरुद्वारें और बुद्ध विहार अब सजने लगे है !
"चंद दिनो मे इलेक्शन आ चुके,ढोल, ताशे, नगरे बजने लगे है !!, 'फरेबी और झुटे,मक्कारों की फौज निकल पडी मैदानों मे,हम ही तो है तुम्हारे रहनुमां,सभी के बोल गजने लगे है !!"
अशा प्रकारे सर्व धर्मीय प्रार्थना स्थळांपासून ते गल्ली बोळांपर्यंत लबाड पुढाऱ्यांद्वारे मतदार राजांचे उंबरे झिजवणे सुरु झाले आहे,
उठ सूट कोणीही राजकारण करण्याअगोदर सामाजिक कार्य करणे महत्त्वाचे आहे, त्यातून समाजात ओळख निर्माण होते, याचा अगोदर उड्या मारणाऱ्या भावी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य यांनी अभ्यास केला पाहिजे असे परखड मत प्रभागातील मतदार बंधू - भगिनी करत आहेत, एक मत अत्यंत अनमोल आहे याची जाणीव मतदार बंधू भगिनींना झालेली आहे, तेव्हा कोणी कितीही आश्वासनाचा गाजर दाखवण्याचा प्रयत्न करून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न केल्यास त्यास तोंडघशी पडावे लागणार आहे,
सर्वप्रथम ज्या ज्या प्रभागांमध्ये जनसामान्य नागरीकांच्या मुलभूत सुविधा, समस्या,रस्ते,पाणी, वीज अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात अकार्यक्षम असल्याच्या  तक्रारी वाढल्याने काही अकार्यक्षम नगरसेवकांनी आता तर प्रभाग क्रमांक बदलून इतर प्रभाग क्रमांकात प्रवेश करत असल्याचे देखील सामोरे येत आहे.आपल्या पुर्वीच्या जुन्या प्रभागा मध्ये सामाजाभिमुख कार्याचे गेल्या पाच वर्षात कोणतेच दिवे लावू शकले नाही ते आता नव्या प्रभागात काय दिवे लावणार ? याकरिता जागृत मतदार बंधू भगिनींनी मतदान करताना सर्वप्रथम आपल्या समस्या सोडविण्यात निवडणुकी अगोदर जो सक्षम असेल त्यालाच मतदान करावे, इतरांच्या भूलथापांना बळी पडून चिरीमिरी घेऊन काही साध्य होणार नाही, पाच वर्ष पुन्हा पश्चचतापशिवाय काहीच उरणार नाही,आपण निवडून दिलेला नगरसेवक निवडून आल्यावर आपल्या प्रभागामध्ये लवकर फिरकणार नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे, हे कुणालाही उद्देशून म्हटलेले नसून कुणी वैयक्तिकरित्या घेऊ नये, मला माझे मत परखड मांडण्याचा अधिकार असल्याने ते मी सर्वसामान्य मतदार बंधू भगिनी यांच्या माहितीसाठी माझे परखड मत मांडत आहे. आणी त्यात गैर ते काय?  म्हणून "ताई - माई, अक्का, यावेळी खरा विचार करा पक्का !,भिकार - भंगारांना सोडा,आणि निष्ठावंतांना मारा शिक्का तरच आपल्या देशात लोकशाही टिकेल एकढ मात्र नक्की,

✍️ : लियाकतखान पठाण - संगमनेर संपादक: साप्ता. खरे सव्वाशेर  संपर्क 96 65 28 20 10

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल विरोध करणाऱ्यांना मारहाण; पालिका प्रशासनाकडे केली तक्रार,प्रति हॉटेल 1500 रुपये?


​संगमनेर प्रति: दि 03 नोव्हेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, शहरात नगरपालिकेच्या कचरा घंटागाडीचा ड्रायव्हर दबंगगिरी करत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिवाळीच्या तोंडावर या ड्रायव्हरने शहरातील अनेक हॉटेल व्यावसायिकांकडून सक्तीने प्रति हॉटेल 1500 रुपये याप्रमाणे सुमारे तीन लाख रुपयांच्या आसपास रक्कम वसूल केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.ही एक प्रकारे 'हप्ता वसुली सुरू असून, पैसे न दिल्यास हॉटेलमधील कचरा न उचलण्याची धमकी दिली जात आहे. विशेष म्हणजे या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ​याबाबत तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, संबंधित ड्रायव्हरने एका हॉटेलमध्ये घुसून तेथील कारागिरांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ड्रायव्हरच्या या गुंडगिरीमुळे समस्त हॉटेल व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. ​या प्रकाराला कंटाळून शहरातील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येत नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

     सदर ड्रायव्हर वेळेवर कचरा संकलनासाठी येत नाही?

​विचारणा केल्यास अत्यंत उरमटपणे बोलतो, आवाज चढवतो आणि मारायची भाषा करतो. ​मनात येईल तेवढ्या पैशांची मागणी करतो व न दिल्यास अरेरावीची भाषा करतो. ​माझी कुठेही तक्रार करा, मी तसाही गाडीवरच्या संघटनेचा अध्यक्ष आहे, माझं कोणीही काही वाकडं करू शकत नाही. तक्रार केल्यास काम बंद करेल, अशी धमकी देखील देतो.
​हॉटेल राजबक्षी, हॉटेल अवजिनाथ, नवरत्न हॉटेल, दोस्ती हॉटेल, ग्रेप्स गार्डन, स्वामी समर्थसह अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या सदर तक्रार अर्जावर सह्या केलेल्या आहेत.
तर ​अश्या गुंड प्रवृत्तीच्या ड्रायव्हरची त्वरित कामावरून हकालपट्टी करावी, अन्यथा सर्व हॉटेल व्यावसायिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा देखील दिलेला आहे.
तसेच, हॉटेल व्यावसायिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यालयातही अर्ज देऊन पाठिंबा मागितला आहे, कारवाई न झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. आरोग्य अधिकारी पठाण साहेब यांनी ड्रायव्हरला पाठीशी न घालता त्वरित कारवाई करावी,अशी मागणीही करण्यात आली आहे.शहरात अनेक ठिकाणी दिवसाढवळ्या कचऱ्याचे ढीग पडलेले असून, ठेकेदाराकडून पालिका नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या कचरा संकलनाचा ठेका कायमचा रद्द करण्याची मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन, गुंड प्रवृत्तीच्या ड्रायव्हरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांन मधून होत आहे.

तमाशा कलावंत कोंडीराम आवळे मास्तर कांताबाई सातारकर स्मृति पुरस्काराने सन्मानित,त्याच भूमीत झालेला सन्मान मोठा असल्याची भावना;




​संगमनेर.प्रति: दि नोव्हेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार,राज्यातील कर्तबगार लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण केलेल्या आमदार अमोल खताळ यांच्या मागणीला अखेर मूर्त रूप मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. संगमनेर तालुक्यात औद्योगिक वसाहत (MIDC) स्थापन करण्याच्या त्यांच्या मागणीसाठी पुढील आठवड्यातच विशेष बैठक घेण्याची ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली आहे. ज्येष्ठ तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर यांच्या स्मरणार्थ आयोजित पहिल्या राज्यस्तरीय पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.                 पहिला कांताबाई सातारकर स्मृति पुरस्कार 

आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्या राज्यस्तरीय 'कांताबाई सातारकर स्मृति पुरस्कारा'ने साताऱ्याच्या वाई येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत कोंडीराम आवळे मास्तर यांना सन्मानित करण्यात आले. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रु. 21000 हजार- मानधन देऊन आवळे मास्तर यांचा गौरव करण्यात  आला,पुरस्कार स्वीकारताना आवळे मास्तर यांनी आपल्या 80 वर्षांच्या कारकिर्दीतील हा पहिला पुरस्कार असून, ज्या भूमीत कलेची सेवा केली, त्याच भूमीत झालेला सन्मान मोठा असल्याची भावना व्यक्त केली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी बोलताना आमदार खताळ यांच्या कार्यशैलीचे अनोख्या शब्दांत कौतुक केले. सरकारमधील मंत्र्यांकडून कामे कशी दादागिरीने मंजूर करून घ्यायची, हे अमोल खताळ यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. अंगावर 'जळू' जसा चिकटून राहतो, तसा राजकीय 'जळू' अमोल खताळ यांच्याकडे आहे," असे सांगत त्यांनी खताळ यांची मागणी नाकारणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. युवकांच्या रोजगारासाठी खताळ यांची असलेली धडपड पूर्णत्वास नेण्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नसल्याचे आश्वासनही सामंत यांनी दिले.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आमदार खताळ यांच्या माध्यमातून लोककलावंतांचा झालेला सन्मान सोहळा तालुक्याची नवी ओळख निर्माण करणारा ठरला असल्याचे गौरवोद्गार काढले. बाकीचे उद्योग तालुक्यात आता बंद झाले, असा टोला लगावत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला आणि औद्योगिक वसाहतीसाठी आपणही पाठपुरावा करू, असे जाहीर केले. तसेच, जिल्ह्याच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मराठी भाषा व सांस्कृतिक भवन उभारणीसाठी जागा देण्याची मागणी त्यांनी केली. आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यात नवसांस्कृतिक पर्व निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले आणि औद्योगिक वसाहतीच्या घोषणेला मंत्री सामंत यांनी मूर्त स्वरूप देण्याची मागणी केली. सोहळ्यात व्यासपीठावर पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश चंदनशिवे, शाहीर विठ्ठल उमप यांच्या कन्या संगीता आणि कविता उमप, प्रा. एस. झेड. देशमुख, बापुसाहेब गुळवे, डॉ. सोमनाथ मुटकुळे यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी व साहित्य-कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

✍️: जमिर शेख संगमनेर







श्रीरामपूरचे शेख बरकत अली राष्ट्रवादी (शरदचंद्रजी पवार) पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस' पदी निवड ;



​अहिल्यानगर/श्रीरामपूर: प्रति: दि 01 नोव्हेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे श्रीरामपूर येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, शेख बरकत अली यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार पक्ष) च्या संघटनात्मक पातळीवर मोठी आणि महत्त्वपूर्ण निवड झाली आहे. त्यांची थेट अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्हा सरचिटणीस या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शेख बरकत अली हे महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि 'राजकारण समाचार' वृत्तपत्र व न्यूज चॅनलचे मुख्य संपादक म्हणून परिचित आहेत. त्यांची ही निवड त्यांच्या व्यापक सामाजिक जनसंपर्काची आणि कार्याची पावती मानली जात आहे.पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोक भाई बागुल यांच्या महत्वपूर्ण शिफारसीनुसार ही नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे जिल्हाप्रमुख ऍड. प्रशांतजी वरपे यांनी शेख बरकत अली यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. 27 ऑक्टोबर 2025 रोजी श्रीरामपूर येथील व्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत या निवडीची घोषणा करण्यात आली होती.दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी ॲड. संदीप वरपे यांच्या कार्यालयात शेख बरकत अली यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस अशोक भाई बागुल, अल्पसंख्याक सेलचे श्रीरामपूर शहराध्यक्ष नाझिश शाह, महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष संदीप पवार आणि ठेकेदार पंडितराव आदी मान्यवर उपस्थित होते. ​शेख बरकत अली यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील पक्ष संघटनेत नवा उत्साह संचारला असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लकी सेठी, ॲड. राजेश बोर्डे, डॉक्टर बडाख, तसेच राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष नाजिश शाह, शहर उपाध्यक्ष जुनेद भाई शेख, अल्पसंख्याक सेलचे शहर कार्याध्यक्ष मोहसीन जहागीरदार आणि साजिद भाई शाह, समाजसेवक मतीन भाई शाह, शिक्षक संघटनेचे नेते रावसाहेब पवार, तालुका अध्यक्ष शिवाजी गोसावी,यांच्यासह महाराष्ट्र लघु वृत्तपत्रकार संघाचे इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हा उपाध्यक्ष शौकत पठाण, सौ. समिना शेख, सौ. जयश्री गायकवाड, सौ. सुप्रिया घोलप, सौ. बानूबी शेख आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांसह, सुरेश तडके, वडीतके, सुभाष हळनोर, राजू थोरात, हनुमंत खरात, नाना तुपे, इसाक पटेल, वाल्मीक ढोक चवळे, संदीप पवार, राज मोहम्मद शेख, अकबर भाई शेख, एजाज सय्यद आदींनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.



✍️: कार्यकारी संपादक शौकत पठाण संगमनेर

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget