आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश,तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून पुरस्कार जाहीर;
संगमनेर प्रति : दि 25 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, आयुष्यभर तमाशा या लोककलेचे जतन, संवर्धन करत कलाप्रेमींचे मनोरंजन व समाजप्रबोधन करणारे संगमनेर येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत, स्व. कांताबाई सातारकर यांचे सुपुत्र तसेच अखिल भारतीय तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्ष तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून लोककला क्षेत्रातील सर्वोच्च असा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या घोषणेमुळे संपूर्ण तमाशा कला क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.संगमनेर ही लोककलावंतांची पवित्र भूमी म्हणून ओळखली जाते. शाहीर कवी अनंत फंदी, प्रथम महिला तमाशा कलावंत पवळा भालेराव हिवरगावकर, लोकशाहीर विठ्ठल उमप, लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर तसेच ज्येष्ठ तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर हे संगमनेरचे भूषण मानले जातात. या सर्व लोककलावंतांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने दरवर्षी लोककला पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मागील वर्षी स्व. कांताबाई सातारकर यांच्या नावाने दिला जाणारा लोककला पुरस्कार सातारा जिल्ह्यातील तमाशा कलावंत कोंडीराम आवळे मास्तर यांना उद्योगमंत्री उदय सामंत व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. संगमनेर येथील कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह बंदिस्त करण्यात येत असून, त्या ठिकाणच्या रंगमंचाला स्व. कांताबाई सातारकर यांचे नाव देण्यात यावे, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी शासन दरबारी पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच स्व. कांताबाई सातारकर किंवा रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार प्रदान करण्यात यावा, यासाठी आमदार खताळ यांनी मंत्री उदय सामंत व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत केंद्र सरकारने महाराष्ट्रातील तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. त्यामुळे तमाशा कलावंतांमध्ये तसेच खेडकर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे......................... कोट ....................................
“माझ्या मातोश्री स्व. कांताबाई सातारकर यांच्या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे खेडकर परिवाराला केंद्र किंवा राज्य सरकारचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्याच मागणीला यश येऊन मला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार म्हणजे संपूर्ण तमाशा कलेचा केंद्र सरकारने केलेला सन्मान आहे. हा पुरस्कार माझ्या आईला मिळायला हवा होता, मात्र तिच्या आशीर्वादामुळेच तो मला मिळाला, असे मी माझे भाग्य समजतो.” रघुवीर खेडकर (अध्यक्ष, अखिल भारतीय तमाशा फड मालक संघटना, महाराष्ट्र राज्य)
........................ कोट ..............................
तमाशा सम्राट रघुवीर खेडकर व त्यांच्या मातोश्री स्व. कांताबाई सातारकर यांनी तमाशा लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने संगमनेरचे भूषण रघुवीर खेडकर यांना कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्याने संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून मला व सर्व संगमनेरकरांना अत्यंत आनंद होत आहे. लवकरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने सर्व संगमनेरकरांच्या वतीने त्यांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.” अमोल खताळ (आमदार)
छात्र भारती ही गरिबांच्या शिक्षणासाठी गेली 42 वर्ष महाराष्ट्रभर काम करत आलेली आहे ;
संगमनेर प्रति: दि 25 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी साथी अनिकेत घुले यांची मुंबई येथील बेचाळीसाव्या अधिवेशनात निवड करण्यात आली आहे. 42 वे राज्य अधिवेशन मुंबईत काळा चौकी या ठिकाणी 24 आणि 25 जानेवारी 2026 रोजी पार पडले आहे. या अधिवेशनामध्ये सर्वांनुमते अनिकेत घुले यांची एकमताने निवड झाली. यावेळी छात्रभारतीचे मावळते अध्यक्ष रोहित ढाले, राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजा कांदळकर हे उपस्थित होते.अनिकेत घुले यांची ओळख गेली दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांचा आवाज अशी आहे. शिक्षणाच्या प्रश्नावर ते काम करत आलेले आहे. अनेक आंदोलनांमध्ये विद्यार्थ्यांना फी चे पैसे परत मिळवून देणे, संस्थाचालकांच्या विरोधात थेट जाऊन भूमिका घेणे. कॉलेज प्रशासन सरकारच्या विरोधात कायम ते रस्त्यावरती आंदोलन करत आलेले आहे. संगमनेर मध्ये जवळपास विद्यार्थ्यांना 2024- 25 साली एक कोटी रुपये पेक्षा जास्त रक्कम त्यांनी परत मिळूवून दिली. मराठी शाळा वाचवण्यामध्ये अनिकेत घुले यांनी महाराष्ट्र मध्ये फिरून मराठी शाळा वाचवा असे अभिमान राबवले होते. मोठे मोर्चेही काढले होते. कॉलेजमध्ये जाऊन वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेमध्ये संविधान समजून सांगणे ही अनिकेत यांची ओळख आहे.छात्र भारती ही गरिबांच्या शिक्षणासाठी गेली 42 वर्ष महाराष्ट्रभर काम करत आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या कॉलरशिप खाजगीकरण, मराठी शाळा, भ्रष्टाचार अश्या मुद्यावर लढत आलेली आहे.डॉ नरेंद्र दाभोळकर, डॉक्टर मु.ब. शहा, कपिल पाटील, डॉ. ना. य.डोळे सर, यदुनाथ थत्ते यासह अनेक मोठ्या लोकांचा छात्र भारतीला वारसा आहे. अनिकेत घुले यांचे महाराष्ट्रभरामधून सगळीकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.
हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त तसेच त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने संगमनेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अभिवादनपर जयंती महोत्सव साजरा करण्यात आला ;
संगमनेर प्रति: दि 24 जानेवारी 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, काल दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीचे औचित्य म्हणून संगमनेर शिवसेनेच्या वतीने नवीन नगर रोड येथे बस स्थानका समोर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा पुजन करुन जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात यांनीही उपस्थित राहून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत पुष्पहार अर्पण केला. विधानपरिषद आमदार सत्यजितदादा तांबे हे देखील यावेळी उपस्थित होते,व त्यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले व उपस्थित शिवसैनिक आणि ठाकरेप्रेमींशी संवाद साधला. त्याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीरजी तांबे साहेब हे देखील उपस्थित राहिले व त्यांनीही अभिवादन करत हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीला उजाळा देत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रसाठी व मराठी माणसांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती देत उपस्थितांना संबोधित केले.शिवसेना जिल्हाप्रमुख सचिनभाऊ कोते पाटील देखील संगमनेर येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थिताना मार्गदर्शन देखील केले व घर तेथे शिवसैनिक गाव तेथे शाखा हा उपक्रम करणार असल्याचे आणि 80% समाजकारण 20 %राजकारण हे शिवसेनाप्रमुखांच्या ब्रीदवाक्याने संगमनेरसह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेची वाटचाल पुढे चालू राहील असे मनोगत व्यक्त केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे खासदार संजय राऊत साहेब, विनायक राऊत, खासदार अनिलभाऊ देसाई, संपर्कप्रमुख सुनीलजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभेत शिवसेनिकांची वज्रमुठ बांधून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर महाविकास आघाडी सोबत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी एकत्रित राहून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची ही ग्वाही दिली,यावेळी शिवसेना मा शहरप्रमुख अमर भाऊ कतारी यांनी मान्यवरांचे स्वागत केले व हिंदूहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संगमनेर तालुक्यात व शहरात घराघरात शिवसेना वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले हीच साहेबांना श्रद्धांजली व अभिवादन ठरेल असे मत अमर कतारी यांनी व्यक्त केले यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, संपर्कप्रमुख नरेशजी माळवे, दिव्यांग सहाय्यसेना जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे, शिवसेना संगमनेर तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शिवसेना शहरप्रमुख असिफ तांबोळी शिवसेना दक्षिण शहरप्रमुख वैभव अभंग यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत अभिवादन केले. युवासेना तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ व शहर प्रमुख गोविंद नागरे, मुस्लिम मावळा अजिज मोमीन यांनी जोरदार घोषणाबाजी करत जय भवानी जय शिवाजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा जोरदार घोषणा देत साहेबांना अभिवादन केले, यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कोते,पाटील तालुकाप्रमुखूप भाऊसाहेब हासे मा शहरप्रमुख अमर कतारी, युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवा तालुका प्रमुख अक्षय गुंजाळ, युवा सेना शहर प्रमुख गोविंद नागरे युवासेना तालुकाप्रमुख सागर भागवत, अजीज मोमीन (मुस्लिम मावळा), महिला आघाडीच्या उप जिल्हाप्रमुख आशाताईं केदारी शहर प्रमुख संगीता गायकवाड वैशालीताई वडतल्ले , 32 गाव आश्वी विभाग तालुकाप्रमुख ,प्रकाश गायकवाड, रंगनाथ फटांगरे, भीमा पावसे, 28 गाव घारगाव विभाग तालुकाप्रमुख अमित फटांगरे, रिक्षा सेनेचे तालुकाप्रमुख अशोक बडे भांडकर माघाडे,संजू सोनावणे, उपतालुकाप्रमुख ,भाऊसाहेब वराळे, अमोल डुकरे, बाळासाहेब कवडे ग्राहक संरक्षक कक्षाचे तालुकाप्रमुख सदाशिव हासे , राजू सातपुते, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख इम्तियाज शेख युवा सेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद उपशहर प्रमुख मुकेश काठे रहिम बेग प्रतीक मिसाळ ज्येष्ठ शिवसैनिक दीपक भाऊ साळुंखे विभाग प्रमुख प्रकाश चोथवे त्रीलोक कतारी उपशहर प्रमुख प्रवीण चव्हाण पठार भागातील ज्येष्ठ शिवसैनिक सुनील भाऊ घुले कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य विजय भाऊ सातपुते सचिन भाऊ धनवट युवा सेना उपतालुक प्रमुख गुलाब कोकाटे बाळासाहेब शिंदे अभिषेक साबळे युवासेनेचे फाइक शेख शुभम वाघ महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे किरण भाऊ घोटेकर संकेत दादा एखंडे पगडाल सर व्यापारी आघाडीचे शहर प्रमुख संभव शेठ लोढा संगमनेर युवा सेना विधानसभा प्रमुख अमोल भाऊ डुकरे युवा सेना उपशहर प्रमुख अक्षय गाडे ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब घोडके सुनील मोरे अशोक भडकवाड ब्रम्हा खिडके दिलीप राऊत यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगमनेर (प्रतिनिधी): दि 24 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी कार्यालयातील लालफितीचा कारभार सामान्य माणसाचे आयुष्य कसे उद्ध्वस्त करू शकतो, याचे जिवंत उदाहरण संगमनेर तालुक्यात समोर आले आहे. साकूर जवळील बिरेवाडी येथील शेतकऱ्यांचे जमीन एकत्रीकरण दुरुस्तीचे प्रकरण गेल्या ३३ वर्षांपासून निकाली निघत नसल्याने, हताश झालेल्या शेतकऱ्यांनी शनिवार, २४ जानेवारीपासून संगमनेर भूमि अभिलेख कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. "३३ वर्षांत ठोस मार्ग काढता आला नाही, की काढायचा नव्हता?"असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
-----------नेमकं प्रकरण काय आहे तर-------------- बिरेवाडी येथील नवनाथ ढेंबरे, पंढरीनाथ ढेंबरे, योगेश ढेंबरे, सुनील ढेंबरे आणि संदीप ढेंबरे या शेतकऱ्यांची सर्वे नंबर १७६, १७७, २०८, २११ व २१२ ची एकत्रीकरणाची जमीन आहे. १९९३ साली त्यांनी या जमिनीच्या दुरुस्तीसाठी भूमि अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. तेव्हापासून आजपर्यंत, म्हणजेच सलग ३३ वर्षे हे शेतकरी न्याय मिळवण्यासाठी नगर, पुणे, नाशिक आणि संगमनेर कार्यालयांचे हेलपाटे मारत आहेत. मात्र, प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांनी विषय मार्गी लागेल अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना केवळ आश्वासनेच दिली. ४ एकर जमीन गेली कुठे? अधिकाऱ्यांवर संशयाची सुई उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी निवेदनात अत्यंत गंभीर आरोप केला आहे. भूमि अभिलेख विभागाच्या चुकीच्या कामकाजामुळे त्यांची ४ एकर जमीनच गायब झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी या प्रकरणात चुकीची कागदपत्रे बनवली असून, जाणूनबुजून हा विषय प्रलंबित ठेवला असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. शासकीय नियमानुसार एखादे प्रकरण इतकी वर्षे प्रलंबित ठेवता येते का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.या जमिनीत शेतकऱ्यांची घरे, बंगले आणि शेती आहे. एकत्रीकरणाचा तिढा सुटत नसल्याने या कुटुंबांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून आजवर त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आम्ही कोट्यावधी रुपये खर्च करून घरे उभी केली, पण कागदोपत्री अडथळ्यांमुळे आम्हाला आता आत्महत्येची वेळ आली आहे, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे. जोपर्यंत या प्रकरणावर ठोस निर्णय लागत नाही आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांची शासन स्तरावर सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार ढेंबरे कुटुंबाने व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे भूमि अभिलेख विभागात एकच खळबळ उडाली असून, आता वरिष्ठ प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आ अमोल खताळ यांनी केले आप्पा केसेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त ;
संगमनेर / प्रतिनिधी: दि 24 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर शहर व ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेसाठी हक्काचा माणूस म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ शिवसैनिक, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख व खंडोबा भक्त आप्पासाहेब केसकर यांचे दुःखद निधन झाले.
शिवसैनिकांच्या अडीअडचणीत धावून जाणारे, एकनिष्ठ, खंबीर व कडवे तसेच शिवसेनेचा निष्ठावंत आधारस्तंभ हरपला असल्याची भावना आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली. आमदार खताळ म्हणाले की, शहरातील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सवानिमित्त देवाच्या विवाह सोहळ्याची तयारी सुरू असताना आप्पासाहेब केसकर यांच्या अचानक छातीत दुखू लागले व चक्कर आली. तातडीने त्यांना संगमनेर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी कुटुंबीयांनी त्यांना पुणे येथे नेले होते. त्यांच्या प्रकृतीची माहिती मी सातत्याने त्यांचे पुतणे अंकुश केसकर यांच्याकडून घेत होतो. ते लवकरच बरे होतील, अशी सर्वांनाच आशा होती. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या प्रकृतीची माझ्याकडे विचारपूस केली होती. मात्र अचानक त्यांची तब्येत अधिक खालावली आणि उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
आप्पासाहेब केसकर यांच्या निधनाने संपूर्ण केसकर कुटुंबावर तसेच संगमनेर तालुक्यातील सर्व जुन्या शिवसैनिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना आमदार खताळ यांनी केली. या दुःखाच्या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच मी स्वतः केसकर कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
शिर्डी (प्रति: दि 24 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, पवित्र शिर्डी नगरीत हॉटेलच्या आडून सुरू असलेल्या अनैतिक मानवी व्यापार (वेश्याव्यवसाय) प्रकरणातील दोन सराईत गुन्हेगारांना शिर्डी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी जेरबंद केले आहे. या कारवाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, पोलिसांनी या सराईत गुन्हेगारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १११ (संघटित गुन्हेगारी) लागू केले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यात अशा प्रकारच्या गुन्ह्याला हे कलम लावण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे आता आरोपींना किमान वर्षभर जामीन मिळणे अशक्य झाले आहे.दिनांक 19/11/2025 रोजी पिंपळवाडी रोडवर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस व विशेष पथकाने पिंपळवाडी रोडवरील हॉटेल साई सहारा येथे छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत अमोल भिमा भोसले (वय २४) आणि गणेश सीताराम कानडे (वय ४१) या दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली होती. साधारणपणे वेश्याव्यवसायासारख्या (पिटा) गुन्ह्यात आरोपी ८ ते १० दिवसांत जामिनावर बाहेर येतात. मात्र, या प्रकरणातील आरोपी अमोल भोसले आणि गणेश कानडे हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.ज्यामधे अमोल भोसले या आरोपीवर यापूर्वी ३ गुन्हे दाखल. तर गणेश कानडे या आरोपीवर: यापूर्वी ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी या गुन्ह्यात संघटित गुन्हेगारीचे कलम लावण्याचा प्रस्ताव दिला होता, ज्याला अपर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांनी मंजुरी दिली. कलम १११: 'मोक्का'सारखीच कठोर शिक्षा नवीन कायद्यातील कलम १११ हे खास करून संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी समाविष्ट करण्यात आले आहे.
--------या कलमांतर्गत काय आहे शिक्षा----------- १) शिक्षा: गुन्हेगारांना जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. २) जामीन: हे कलम लागल्यामुळे आरोपींना आता सहजासहजी जामीन मिळणार नाही. किमान एक वर्ष त्यांना कोठडीतच राहावे लागेल. ३) अंमलबजावणी: जिल्ह्यात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या टोळ्यांविरुद्ध पहिल्यांदाच या प्रभावी कलमाचा वापर करून पोलिसांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. पोलीस प्रशासनाचा कडक इशारा "कोणत्याही परिस्थितीत शहरात अनैतिक व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही," असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे शिर्डीतील अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.-----------------------------
👉------💐 पोलिसांचे कौतुकच 💐 --------🙏
तर दुसरीकडे मात्र या कारवाईचे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तोंड भरून कौतुक देखील केले जात आहे कारण या कारवाईमध्ये सदरचे कलम या गुन्ह्याला लावले नसते तर मात्र आरोपी आठ ते दहा दिवसात जामिनावर बाहेर आले असते पुन्हा तेच धंदे सुरू झाले असते मात्र वेश्याव्यवसाय सारख्या गुन्ह्याला सदरचे कलम अहिल्यानगर जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच लावण्यात आले आहे आणि नवीन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यातून दिसून आली आहे, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय अधिकारी अमोल भारती आणि शिर्डी पोलीस पथकाने केली आहे.
त्याच गुन्ह्यात फरार असलेले आणखी दोन आरोपी जेरबंद; संगमनेर आणि नाशिकमध्ये पोलिसांनी टाकला छापा ;
संगमनेर (प्रति): दि.23 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, संगमनेर शहराला विळखा घालू पाहणाऱ्या अमली पदार्थ आणि ड्रग्ज तस्करी विरोधात पोलिसांनी आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. एमडी ड्रग्ज विक्री प्रकरणात फरार असलेल्या दोन मुख्य आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले असून, आता या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या पाच झाली आहे. श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली. गुप्त माहितीवरून संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांचा भारत नगर'मध्ये पहिला छापा पडला,काही दिवसांपूर्वी नाशिकचा तडीपार आरोपी आशिष महिरे याला रंगेहाथ पकडल्यानंतर या रॅकेटमधील काही आरोपी फरार झाले होते. या फरार आरोपींपैकी एक जण संगमनेरमधील भारत नगर परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मोहंमद साद खालीद शेख (वय २४, रा. भारतनगर, संगमनेर) याला ताब्यात घेतले.दुसऱ्या आरोपीला नाशिकमधून उचलले मोहम्मद शेख याची सखोल चौकशी केली असता, या प्रकरणातील दुसरा आरोपी रेहान शेरखान पठाण (वय १९, रा. वडाळा, नाशिक) हा नाशिकमध्ये असल्याची माहिती समोर आली. वेळ न घालवता पोलीस पथकाने नाशिक गाठले आणि तिथे छापा टाकून रेहानला अटक केली. संगमनेर पोलिसांनी नाशिकपर्यंत जाऊन केलेल्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत.सदरची धडक कारवाई ही अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि डॉ. कुणाल सोनवणे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. या संयुक्त पथकात अपर पोलीस अधीक्षक कार्यालय (श्रीरामपूर) पो. कॉ. अशोक शशिकांत गाडे, राजेंद्र भाऊसाहेब बिरदवडे, सहदेव सुभाष चव्हाण. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय (संगमनेर): पो. ना. बापूसाहेब सूर्यभान हांडे, राहुल कैलास सारबंदे, सुनील श्रीधर ढाकणे.आदींचा समावेश होता या कारवाईसह आतापर्यंत या ड्रग्ज रॅकेटमधील एकूण ५ आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. या अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे नेमके कुठेपर्यंत पसरलेले आहे आणि यामध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. संगमनेर शहर 'ड्रग्जमुक्त' करण्यासाठी पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.
आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण आणि सक्रिय पाठपुराव्यामुळेच ही रखडलेली विकासकामे आज प्रत्यक्षात सुरू झाली;
संगमनेर:प्रति: दि 23 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार,संगमनेरमधील विकासकामांवरून सुरू असलेला वाद आता पूर्णपणे उघड झाला आहे. वर्षानुवर्षे फाईल मध्ये धूळ खात पडून असलेली कामे आज प्रत्यक्ष जमिनीवर दिसू लागली, तेव्हाच काही तथाकथित नेत्यांना अचानक विकासाची आठवण झाली. याच क्षणापासून श्रेय लाटण्याची घाई सुरू झाली असून हा प्रकार म्हणजे संगमनेरच्या जनतेच्या बुद्धिमत्तेचा उघड अपमान असल्याची टीका युवा सेनेचे तालुकाध्यक्ष सुशील शेवाळे यांनी केली युवा सेनेच्या वतीने प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की नवीन लोक प्रतिनिधी आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण आणि सक्रिय पाठपुराव्यामुळेच ही रखडलेली विकासकामे आज प्रत्यक्षात सुरू झाली आहेत, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. केवळ कागदा वर मंजुरी मिळवून विकास झाल्याचा गवगवा करता येत नाही. निधी वेळेत उपलब्ध करून घेणे, प्रशासकीय अडथळे दूर करणे, कामे सुरू करणे आणि जनतेला प्रत्यक्ष दिलासा मिळवून देणे हेच खरे नेतृत्व असते.विकास कामे मंजुरी असूनही इतकी वर्षे का रखडली? जनतेला त्रास होत असताना तेव्हा पुढाकार घेण्याचे धाडस कुणी का दाखवले नाही? याचे उत्तर आजही जनतेला मिळालेले नाही. आज जेव्हा विकासकामे प्रत्यक्ष मार्गी लागत आहेत, तेव्हा जुन्या फाईली हातात घेऊन श्रेय घेण्याचा निर्लज्ज प्रयत्न सुरू आहे. जनतेच्या पैशातून होणाऱ्या कामांवर स्वतःचे नाव चिकटवण्याची ही मानसिकता म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा कळस आहे.धमक्या, आक्रमक भाषा आणि खोटे दावे करून संगमनेरची जनता घाबरणारी नाही. आता जनता कागदी मंजुरीवर विश्वास ठेवत नाही, तर प्रत्यक्ष रस्त्यावर सुरू असलेल्या कामांवर विश्वास ठेवते. काम शून्य आणि बोलबच्चनगिरी प्रचंड अशा राजकारणाला आता संगमनेरमध्ये माफी नाही नसल्याचा खणखणीत इशारा त्यांनी दिला
...........।।।।।।।।....चौकट....।।।।।।।।..................... शिवसेना ही केवळ बोलणारी नव्हे, तर काम करणारी संघटना आहे. खोट्या श्रेयवादाला आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांना यापुढे उघडपणे आणि ठोस शब्दांत उत्तर दिले जाईल. अन्यथा जनता योग्य वेळी योग्य निर्णय देईल, हे निश्चित आहे, श्री सुशील शेवाळे अध्यक्ष -संगमनेर तालुका युवा सेना
मच्छिंद्रनाथगड देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जासाठी प्रयत्नशीलआ. अमोल खताळ; धर्मबीज निमित्त सप्ताहाची सांगता ;
संगमनेर प्रति: दि 21 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील मच्छिंद्रनाथगड मंदिर हेजागृत देवस्थान असून, या देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वप्रथम ‘क’ वर्ग देवस्थान दर्जामध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव तयार करावा. हा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मांडून मंजूर करून घेतला जाईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी मालदाडकरांना दिला.मालदाड येथील मच्छिंद्रनाथगडावर धर्मबीज निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहाची सांगता आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडी फोडून करण्यात आली. यावेळी महायुतीचे ज्येष्ठनेते परसराम नवले, परशुराम नवले, अमित नवले, सूर्यभान नवले, सोमनाथ नवले, कावेरी नवले, सरपंच गोरक्ष नवले, नितीन नवले, बाबाजी नवले, गणपत गुरकुले, लहानू नवले आदींसह महा युतीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार खताळ म्हणाले की, देव व धर्माच्या कार्यात आपला हात कधीच आखडता राहिलेला नाही. मालदाड येथील मच्छिंद्रनाथगडावर केवळ गावातूनच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्या तून भाविक दर्शनासाठी येतअसतात. त्यामुळे मच्छिंद्रनाथगडाकडे जाणार्या रस्त्याबाबत निश्चितच सकारात्मक विचार केला जाईल. मला लहानपणा पासूनच वारकरी संप्रदायाचा खूप अभिमान असल्यामुळे देव-धर्माचे कार्यक्रम कितीही उशिरा असले तरी मी ते टाळत नाही.भजन-कीर्तना सारख्या धार्मिक कार्यक्रमांतून सकारात्मक ऊर्जा मिळते व त्यातून आत्मिक समाधान लाभते, असेही आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
.............................कोट..................................... मालदाड गावासाठी आमदार अमोल खताळ यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. मच्छिंद्रनाथगड मंदिर देवस्थानच्या सभामंडपासाठी १० लाख रुपये दिले असून, देवस्थानकडे जाणारा रस्ता खराब झाल्यामुळे तो कोणत्याही निधीच्या माध्यमातून काँक्रीटीकरण करावा. — सूर्यभान नवले (महायुतीचे नेते)
............... ..............चौकट.................................. काकडवाडी येथील शरद महाराज ढवळे हे लहान मुलांसाठी वारकरी शिक्षण संस्था चालवित आहेत. या संस्थेतील अनाथ मुलांसाठी आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून २२ गाद्या व उशा भेट देण्यात आल्याची माहिती स्वतः शरद महाराज ढवळे यांनी मालदाड येथील मच्छिंद्रनाथगडावरील धर्मबीज निमित्त आयोजित सप्ताहाच्या सांगता प्रसंगी दिली. यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत केले. ........................................................................
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ५ जण जेरबंद! आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल;
कोपरगाव (प्रतिनिधी) दि 11 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे साहेब यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने कोपरगाव शहरात मोठी कारवाई केली आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅस टाक्यांमधून वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अशी झाली कारवाई
जिल्ह्यात अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यांवर कारवाई करण्याच्या सूचना मिळाल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोवे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक कोपरगाव परिसरात तैनात करण्यात आले होते. पेट्रोलिंग दरम्यान पथकाला माहिती मिळाली की, मनोज चंद्रकांत गिरमे हा त्याच्या साथीदारांसह कोपरगाव ते संजीवनी कॉलेज रोडवरील एका कॉम्प्लेक्सच्या मागे अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत आहे. माहितीची खात्री पटताच, स्थानिक पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. यावेळी काही इसम कोणतीही सुरक्षितता न बाळगता गॅस टाक्यांमधून चारचाकी वाहनांमध्ये रिफिलिंग करताना रंगेहात सापडले.ताब्यात घेतलेले आरोपी:
१. मनोज चंद्रकांत गिरमे (वय ४५, रा. निवारा सोसायटी, कोपरगाव) २. सिध्दार्थ संदिप गिरमे (वय २६, रा. निवारा सोसायटी, कोपरगाव) ३. मुज्जमिल जाकिर मन्यार (वय २२, रा. चांदवड, जि. नाशिक) ४. सद्दाम जाकिर मन्यार (वय २५, रा. चांदवड, जि. नाशिक) ५. फहिम हरुन शेख (वय ३०, रा. कोपरगाव)जप्त केलेला मुद्देमाल (एकूण २,४२,०००/- रुपये):गॅस टाक्या: २२,००० रुपये किमतीच्या एच.पी. कंपनीच्या ८ टाक्या (५ भरलेल्या, ३ रिकाम्या).साहित्य: १५,००० रुपयांची इलेक्ट्रिक मोटार व रिफिलिंग पाईप्स. वजन काटा: ५,००० रुपयांचा इलेक्ट्रिक काटा. वाहने: २,००,००० रुपये किमतीच्या दोन चारचाकी गाड्या.जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल शासनाचा कोणताही परवाना नसताना, ज्वलनशील पदार्थांबाबत निष्काळजीपणा दाखवून लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ आणि जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ नुसार गुन्हा (गु.र.नं. ११/२०२६) दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि हरिष भोवे, पोउपनि दिपक मेढे, अंमलदार राहुल द्वारके, राहुल डोके, सतिष भवर, सुनिल मालणकर, भगवान धुळे आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे सपोनि ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या पथकाने केली. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत.
राहुल डोके यांची उल्लेखनीय कामगिरी तपासातील कौशल्य: संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव;
अहिल्यानगर: दि 09 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेत (LCB) कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल राहुल डोके यांनी विविध गुन्ह्यांचा यशस्वी तपास केल्याबद्दल, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मा. श्री. दत्तात्रय कराळे साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी महानिरीक्षकांनी डोके यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.संगमनेर उपविभागीय कार्यालयात असताना अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.अवैध धंद्यांवर लागोपाट कारवाया करणे आणि गुन्हेगारांची अचूक माहिती काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना कायद्याच्या पिंजऱ्यात उभे करण्याची कामगिरी त्यांनी केली आहे.काही महिन्यांपूर्वीच राहुल डोके यांची बदली संगमनेर उपविभागीय कार्यालयातून अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेत झाली आहे. त्यांच्या कामाचा अनुभव आणि कार्यक्षमता पाहूनच स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या या यशात इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले असून, आज संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.